अकोला

Video : 'कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते'

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

सकाळ डिजिटल टीम

अकोला: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. बुलडाण्याचे आमदार असलेले संजय गायकवाड म्हणाले की, मला जर कोरोनाचे जंतू मिळाले असते तर ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते.

राज्यात सध्या कोरोनाचा मोठा संसर्ग पसरला असून, रेमडेसिविर, ऑक्सिजन याच्या तुटवड्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच शिवसेना आमदारांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले गायकवाड?

संजय गायकवाड यांनी केंद्रातील सरकारवर टीका करताना अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. तुमच्या सरकारमुळं लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते. अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मात्र त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो महाराष्ट्राला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून तणाव वाढला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेलेया शिवसेनेचे आमदार अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विरोधातील या लढ्यात सर्वांनी एकत्रितपणे संकटाचा सामना करण्याची गरज असताना सत्ताधारी पक्षाचे आमदारच अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT