panvel12.jpg 
अकोला

अनलॉकमध्ये पार्टी करण्याच्या विचारत असाल तर सावधान...

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः टाळेबंदीनंतर अनलॉक 1.0 सुरू झाला आहे. टाळेबंदीतील बॅकलॉक भरून काढण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे प्लॅन तयार करून ओल्या-कोरड्या पार्ट्यांचे बेत आखले असतील. तुम्हीसुद्धा असेच काही करीत असाल तर सावधान. कारण, नागपुरात अशीच पार्टी तब्बल 80 जणांना भोवली असून, एका पार्टीमुळे 80 हून अधिकजण कोरोना बाधित झाले आहेत. तेव्हा अकोलेकरांनी असे काहीही न करता काही दिवस आणखी कळ काढा असे म्हणावे लागणार आहे. 

नागपूरमधील नाईक तलाव परिसरात एका पार्टीमुळे सातशे नागरिकांना विलगीकरण केंद्रात दिवस काढावे लागत आहेत. विशेष म्हणजे, या पार्टीतील एका कोरोनाबाधितामुळे चक्क 80 नागरिकांना संसर्ग झाला. त्यामुळे दुकाने सुरू झाल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित ही पार्टी सातशे जणांना मनस्ताप देणारी ठरली. नाईक तलाव परिसर मोमीनपुरा व सतरंजीपुऱ्यानंतर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. गेल्या 28 मेपासून आतापर्यंत येथील सातशे नागरिकांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. सतरंजीपुरा व मोमीनपुऱ्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने नाईक तलाव परिसरातून नागरिकांना विलगीकरणात नेण्यात आले. विशेष म्हणजे, यातून आतापर्यंत 80 नागरिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

क्षणिक सुखासाठी नका टाकू परिवाराला धोक्यात
ठिक आहे की, दोन ते अडीच महिने तुम्ही लॉकडाउनमध्ये होता. आता हळूहळू सर्व गोष्टी सुरू होत आहेत. अशातच आता तुम्ही मौजमजेसाठी वेगवेगळ्या गोष्टी करू पाहत आहात. मात्र, तुमची हीच मौजमजा तुमच्या परिवाराला धोक्यात टाकू शकते तेव्हा पुन्हा काही दिवस कळ काढून घरातच राहणे हिताचे ठरणार आहे. 

तरीही याकडे लक्ष द्या
अनलॉक 1.0 मध्ये काही गोष्टी सुरू होत आहेत. तरी काही गोष्टींवर अद्यापही निर्बंध आहेत. त्या निर्बंधाचे पालन करणे अद्यापही अनिवार्य आहे. तेव्हा जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात कायद्या मोडाल तर कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

SCROLL FOR NEXT