illegal biodiesel pump illegal biodiesel pump
अकोला

Malkapur News : राष्ट्रीय महामार्गावर अवैध बायोडिझेलचा गोरखधंदा; धाड टाकून केले जातात पंप सील, मात्र ठोस कारवाई नाही

अवैध बायोडिझेलचा गोरखधंदा हा गत काही वर्षांपासून मलकापूर शहरापासून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर - अवैध बायोडिझेलचा गोरखधंदा हा गत काही वर्षांपासून मलकापूर शहरापासून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या अवैध बायोडिझेलच्या काळ्या बाजारावर जणू काही प्रशासनाचा वचक नाही की काय? अशीच परिस्थिती आहे.

चार-सहा महिन्यातून एखादेवेळी धाड पडते अन् हे अवैध बायोडिझेल पंप सिल केले जातात. तेथील बायोडिझेलचा साठ्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात, मात्र कोणत्याही बायोडिझेल पंपधारकावर ठोस अशी कारवाई केली गेली नसल्याचेच आजपर्यंतच्या कारवाईमधून दिसून आले आहे.

शहरापासून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील चिखली रणथम ते वडनेर व त्याहीपुढे महामार्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक ठिकाणी बायोडिझेलचे हे अवैध बायोडिझेल पंप थाटलेले दिसतात. यातील अनेक पंपावर रात्रीच्या अंधारात बायोडिझेलचे टँकर खाली होतात. तेथून रात्रीच मोठ्या प्रमाणावर या अवैध बायोडिझेलची विक्री सर्रासपणे केली जाते.

तर काही अवैध बायोडिझेलचे पंप हे सकाळी सुध्दा खुलेआमपणे सुरू असतात. परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध बायोडिझेलचा हा गोरखधंदा सुरू असतांनाही प्रशासन मात्र याकडे का दुर्लक्ष करते असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. गत् काही वर्षामध्ये या अवैध बायोडिझेलच्या व्यवसायाने चांगलीच पाळमुळे रोवली आहेत.

हा सुरू असलेला व्यवसाय थांबविण्यासाठी ठोस अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नाही. अनेकदा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारलाही जातो. मात्र करण्यात आलेली कारवाई ही थातूर-मातूर अशा स्वरूपाचीच राहत असल्याने काही दिवस कारवाई केलेले बायोडिझेल बंद ठेवण्यात येऊन पुन्हा ते सुरू केले जातात. मग कारवाई करण्यात येते तरी काय?

त्यातच अशा अवैध बायोडिझेलवर सिल करण्याची कारवाई आजपर्यंत बरेचदा केली गेली. मात्र ते बायोडिझेल पुन्हा सुरू झाल्याचेही प्रकर्षाने समोर आले आहे. अवैध बायोडिझेलच्या या विक्रीचा गोरखधंदा थांबविण्यासाठी प्रशासनाने धडक अशी मोहीम हाती घेण्याबरोबरच केवळ कागदोपत्री कारवाईचा फार्स करण्याचे धाडस दाखविण्यापेक्षा करण्यात येणारी कारवाई ही ठोस अशा स्वरूपाची असावी. अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

अवैध पंप सील

गत तीन ते चार दिवसांपुर्वी मलकापूर परिसरात तीन अवैध बायोडिझेल पंपावर महसूल, पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत ते पंप सिल केले. मात्र ही कारवाई जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे अवैध बायोडिझेलच्या सुरू असलेल्या व्यवसायाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्यानंतर झाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला ह्या अवैध बायोडिझेलच्या सुरू असलेल्या गोरखधंद्याची माहिती नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT