murder esakal
अकोला

अनैतिक संबंधात अडसर ठरतो म्हणून खून करणाऱ्यास जन्मठेप

विशेष म्हणजे या प्रकरणात मृताचे वडील महादेव खडसे यांनी केली असली

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : अनैतिक संबंधात अडसर ठरतो, म्हणून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणी आरोपी गोपाल शेषराव पाटील यास आजन्म कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा मंगरुळनाथ जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली.

याबाबतची माहिती अशी की, ३० नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचा मुलगा अजय महादेव खडसे हा शेतावर कामावर जातो असे म्हणून घरून निघून गेला. मात्र, तो परत न आल्याने शेतात व आजुबाजूला पाहणी केली असता तो आढळून आला नाही. १ डिसेंबर २०१२ रोजी श्याम बाहेती यांच्या शेतातील विहिरीत अजयचा मृतदेह आढळून आला. याबाबतची तक्रार अजयचे वडील महादेव शेषराव खडसे यांनी २ डिसेंबर २०१२ रोजी दाखल केली.

या प्रकरणाचा सखोल तपास केला असता आरोपी गोपाल शेषराव पाटील याने अजय खडसे हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे या प्रकरणात मृताचे वडील महादेव खडसे यांनी केली असली, तरी तपासात ती तक्रार वडिलांनी नव्हे तर, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या नावाने गोपाल शेषराव पाटील याने केल्याचेही तपासात आढळून आले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दोनकलवार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. याप्रकरणी आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. जी. डी. गंगावणे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT