अकोला

कोरोनाने 404 महिलांच्या कपाळावरील पुसले कुंकू

सकाळ वृत्तसेवा

संतोष अवसरमोल

घाटबोरी (जि.बुलडाणा) ः कोरोना संसर्गामुळे अखंड देश हादरला असताना बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झाल्याने एकूण 654 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांची संख्या 10 आहे तर जिल्ह्यातील 404 महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले आहे. आता ही कुटुंबे सावरण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत आहे. (In Buldhana district 404 women were widowed by Corona)

घरातील कर्ता माणूस कोरोनाने हिरावून गेल्याने जिल्ह्यातील 654 व्यक्तीचे संसार उघड्यावर पडले असुन, कोरोनाच्या कहरामुळे आर्थिक, मानसिक झळ सर्वांनाच बसली असून, हे सत्र अद्यापही कायम असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाने चालती, फिरती, बोलती माणसे हिरावून नेली आहे. यातच आयुष्याचा जोडीदार गमावल्याने महिलांचे दुःख सांगून समजत नाही तर वाटूनही घेता येत नाही, असे आहे. कोरोनाने साथ गमावल्याची संख्या जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भाला सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाने बालकांचे, मुलांचे व महिलांचे प्रश्न पुढे आल्याने महिला व बालकल्याण विभागाने यांचा सर्वे करण्याचे काम हाती घेतले आहे.

यामध्ये घराची जबाबदारी असणारे कर्तापुरुषच मोठ्या संख्येने होते. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बहुतांश कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊन पडते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तत्काळ नोकरी किंवा कुठला व्यवसाय मिळणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, नॅशनल फमिली बेनिफिट स्कीम या योजनांमध्ये अशा महिलांची नावे घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात येते.

जिल्हा महिला, बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत असुन महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावोगावी जाऊन याची माहिती घेत आहेत. तरीदेखील या योजनेपासून कोणी वंचित राहू नये, या उद्देशाने घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला असल्यास त्याची माहिती महिला बाल विकास विभागाला द्यावी. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.

त्या विधवा महिलांचे काय

विधवा महिलांच्या पुढच्या आयुष्याचे काय याचे उत्तर शासकीय यंत्रणेकडे नाही. सध्या तरी राज्य शासनाने आई- वडिलांचे छत्र हरविल्या मुलांसाठी बालसंगोपन योजना 5 लाखा पर्यत जाहीर केली आहे. मात्र, कोरोनाने पतीचे निधन झालेल्या विधवा महिलासाठी महिला व बालकल्याण विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाय योजना जाहीर केली नाही. संजय गांधी किंवा राष्टीय कुटुंब कल्याण या योजनेशी जोडायचे झाले तरी ही योजना दारिद्ररेषेखालील कुटुंबासाठी आहेत. त्यामुळे या महिला निकषात बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या विधवा महिलांचे संसार उघड्यावर राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहे

संपादन - विवेक मेतकर

In Buldhana district 404 women were widowed by Corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT