अकोला

नाना पटोलेंच्या नेतृत्वात निघाली भारत बंद रॅली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शेतकरी संघटनांनी आवाहन केलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २७) अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढली. स्वराज्य भवन येथून दुपारी १२.२० ला सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख रस्त्यावरून फिरत नेहरू पार्क चौकात हुतात्मा स्मारकावर पोहोचल्यानंतर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत रॅलीचा समारोप करण्यात आला.

केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे, कामगार कामगार कायदे, वाढती महागाई व बेरोजगारीच्या निषेधार्थ दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली होती. त्याला पाठिंबा देत काँग्रेसने महाराष्ट्रासह देशभर भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अकोला जिल्हा दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने अकोला शहरातून रॅली काढत व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. स्वराज्य भवनापुढून रॅलीला १२.२० वाजता सुरुवात झाली. स्वतः नानाभाऊ मोटारसायकल चालवत रॅलीमध्ये सहभागी झाले. शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

अशी निघाली रॅली

स्वराज्य भवन येथून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर गांधी रोडवरील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत रॅली सिटी कोतवाली मार्गे टिळक रोडवर पोहोचली. या मार्गावरील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. पुढे आकोट स्टँडमार्गे अग्रसेन चौक, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट येथे रॅली पोहोचली. रतनलाल प्लॉट येथे कपिल रावदेव यांच्या नेतृत्वात रॅलीचे ढोलताशे व आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. पुढे सिव्हिल लाइन्स चौक, नेहरू पार्क चौक मार्गे दुपारी १.१५ वाजता हुतात्मा स्मारकावर रॅली पोहोचल्यानंतर तेथे हुतात्म्यांना नानाभाऊंनी श्रद्धांजली वाहली. त्यानंतर मनपातील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी रॅलीचा समारोप झाल्याचे जाहीर केले.

व्यापाऱ्यांकडून पाठ

दीड वर्षांपासून कोरोना संकटाशी झुंजत असलेल्या व्यापाऱ्यांनी भारत बंदकडे पाठ फिरविल्याचे अकोला शहरात दिसून आले. काँग्रेसच्या रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हा व्यापारी केवळ शटर खाली ओढून घेत होते. रॅली पुढे निघाली की पुन्हा शटर उघडण्यात आले. भारत बंदचा अकोला जिल्ह्यात कुठेही प्रभाव दिसून न आल्याने एक प्रकारे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बंदचा फज्जा उडाल्याचे बघावयास मिळाले.

वाहतूक पोलिसांचा चौक बंदोबस्त

भारत बंदची रॅली शहरातील बाजारपेठे व मुख्य रस्त्यावरून निघाली असता वाहतूक पोलिसांनी चौका-चौकात चौख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे नियंत्रण केले. खुले नाट्यगृह चौक, सिटी कोतवाली चौक, रयत हवेलीजवळ, अकोट स्टॅण्ड, दुर्गा चौक, रतनलाला प्लॉट चौक, सिव्हिल लाइन्स चौक, नेहरू पार्क चौक आदी ठिकाणी वाहतूक थांबवून रॅलीला मार्ग मोकळा करून देण्यात आला.

बाजार समितीतील व्यवहार बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील भारत बंदमध्ये सहभागी झालेली ही एकमेव बाजार समिती होती. इतर ठिकाणी मात्र व्यवहार सुरू होते.

इंटकचा नावालाच सहभाग

संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनात अकोला जिल्हा इंटक सहभागी झाली. मात्र, बंदमध्ये इंटकचा सहभाग नावालाच होता. इंटक जिल्हा अध्यक्ष व इंटकचे प्रदेश सचिव प्रदीप वखारिया व महानगर अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकऱ्यांप्रती आत्मियता होती, ते सोबत आले!

भारत बंदचे आवाहन केल्यानंतर काँग्रेसने काढलेल्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहभागी होण्याचे ठरविले होते. प्रत्यक्षात मात्र, महाविकास आघाडीतील कोणताच घटक पक्ष रॅलीत सहभागी झाला नाही. याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्यांना शेतकऱ्यांप्रती आत्मीयता होती, ते आमच्यासोबत आले, ज्यांना नव्हती ते सोबत आले नाही, असा टोला राकाँ व शिवसेनेला नानाभाऊंनी लगाविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT