inspiring story og shishir ghongate craking upsc exam became capf officer Sakal
अकोला

Success Story : मोताळ्याच्या भूमिपुत्राची UPSCमध्ये गरुडझेप; केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी

Shishir Ghongate : आव्हा येथील शिशिर गजानन घोंगटे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत देशभरातून ९० वा क्रमांक पटकावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा : तालुक्यातील आव्हा येथील शिशिर गजानन घोंगटे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत देशभरातून ९० वा क्रमांक पटकावला आहे. त्याने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडंट (सहाय्यक समावेशक) पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे मोताळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

शिशिर घोंगटे हा तालुक्यातील आव्हा येथील रहिवासी आहे. त्याचे वडील प्रा.गजानन घोंगटे हे वनोजा ता. मंगरूळपीर येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात प्राध्यापक असून, त्याची आई कल्पना घोंगटे या कळुबाई कन्या विद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

शिशिरने या परीक्षेसाठी प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे सलग सहा महिने कसून तयारी केली होती. त्यानंतर त्याने थेट दिल्ली गाठली. नुकताच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून, शिशिरने संपूर्ण भारतातून ९० वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याची केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली आहे. असिस्टंट कमांडंट हे पद उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाचे आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिशिर हा भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पोलिस दलात रूजू होणार आहे. जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर शिशिरने यशाच्या आकाशात उत्तुंग गरुडझेप घेतली आहे. त्याने या यशाचे श्रेय आई, वडिल व शिक्षकांना दिले आहे. या यशाबाबद्दल त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आव्हा या छोट्याशा गावातील तीन युवक पुणे येथे चार्टंट अकाउंटंट असून, तीन विद्यार्थी सीएची परीक्षा देत आहेत. एक युवक शेगाव येथे तालुका वैद्यकीय अधिकारी आहे. एक जण बोराखेडी येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर, एक युवक नुकताच भारतीय सैन्यात भरती झाला आहे. त्यामुळे आव्हा गावासह तालुका व जिल्ह्याचा अभिमान वाटतो.

- शुभम घोंगटे, युवासेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख, बुलडाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT