पाऊस  
अकोला

येत्या तीन-चार दिवसात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार

पावसाचे वेध, उकाडा वाढला

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः वातावरणात उकाडा वाढला असून, घामाच्या धारा फुटत आहेत. हा उकाडा म्हणजे पावसाचे संकेत असून, येत्या तीन-चार दिवसात राज्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. It will rain in all the districts in the next three-four days


हिंदी महासागरात विषुववृत्ताच्या जवळ म्हणजे शून्य अक्षांशवर ताऊटे वादळाची निर्मिती झाली असून, प्राथमिक अवस्थेत वादळ आखाती देशाकडे प्रयाण करणार असे संकेत वेधशाळेमार्फत दिले गेले. रविवारी (ता.१६) हे वादळ गोवा-कोकण किनाऱ्याजवळ पोहोचले व त्याच्या उच्चतम स्थितीपर्यंत पोहोचले आहे. परिणामी, गोवा, कोकणसोबत पुणे आणि नाशिक विभागात जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणात वाऱ्याची गती ७० किमी प्रतितास पेक्षा जास्त असू शकते. वादळाचे विस्तारित टोक/घेर मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातपर्यंत पोहोचले आहे. परिणामी वातावरण ढगाळलेले, उष्ण-दमट राहणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले. विशेषतः विदर्भात उष्ण-दमट वातावरण अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


राज्यात पावसाची शक्यता पश्चिम ते पूर्व अशी उतरत्या क्रमाने राहील, कोकणात जास्त तर विदर्भात कमी. येत्या तीन ते चार दिवसात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता जास्त आहे. वादळ ओसरल्यावर मॉन्सूनची वाटचाल सामान्य म्हणजे १ जून रोजी केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

रविवार ठरला उष्ण-दमट
हवामानातील बदलासोबतच रविवारी तापमानात वाढ होऊन दिवसभर उष्ण झळा जाणवल्या तसेच ढगाळ वातावरणाची निर्मिती होऊन दमटप अधिक जाणवला. पुढील दिवसात दमट वातावरणात वाढ होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

संपादन - विवेक मेतकर

It will rain in all the districts in the next three-four days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT