Janata Curfew 
अकोला

‘जनता कर्फ्यू’ची दोन वर्ष; आजही उडतो थरकाप!

कोरोनाचे संकट कमी; अद्यापही धोका टळलेला नाही

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्वप्नातही विचार केला नव्हता ‘कोरोना’ नावाचा विषाणू आपल्या सुखी आयुष्यात डोकावून बघेल आणि अनेकांना होत्याचे नव्हते करून जाईल. दोन वर्षापूर्वीची परिस्थिती... सगळेच अनभिज्ञ... सगळ्यांच्याच मनात एक अनामिक भीती...आणि ता. २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन... या घटनेला ता. २२ मार्च २०२२ रोजी दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

जनता कर्फ्यूदरम्यान संपूर्ण बाजारपेठ, भाजीबाजार, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. करोनाची धास्ती नवीन असल्याने नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी आपापल्या ठिकाणी थाळ्या आणि घंटा वाजवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत नागरिकांनी आपापल्या घरांच्या गच्चीवर, गॅलरीत येऊन सहकुटुंब थाळ्या आणि घंटा वाजविल्या होत्या. अनेक उत्साही नागरिकांनी फटाकेदेखील फोडले होते. जनता कर्फ्यूदरम्यान संपूर्ण रहदारी बंद होती, रस्त्यावर वाहने नव्हती आणि एकही माणूस दिसत नव्हता. त्यामुळे, अकोला शहराच्या भागातील नागरिकांना कधी नव्हे इतकी शांतता त्या दिवशी अनुभवायला मिळाली. त्यानंतरच्या काळात मे महिन्याच्या मध्यापर्यंत काटेकोर लॉकडाउनचा कठीण काळही सर्वांनी अनुभवला.

दोन वर्षे अनामिक भितीत ता. २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले. एक मोठे संकट होते. हे संकट निघून जाण्यासाठी दोन वर्षे लागलीत. ही दोन वर्षे नागरिकांनी अनामिक भितीत घालविली.

कुणी अनाथ झाले, कुणी

म्हातारपणीचा आधार गमाविला

कोरोनाच्या संकटात अनेकांचे प्राण गेले. त्यात कुणी अनाथ झाले तर कुणाचा म्हातारपणीचा आधार हिरावल्या गेला. कुटुंबंच उध्दवस्त झाल्याचे बघावयास मिळाले. अनेकांचे रोजगार बुडाले. व्यावसायाला टाळे लागले. मजुरीही मिळेना अशी परिस्थिती दोन वर्षांत होती. ही परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, ज्यांचे रोजगार गेले ते आजही सर्व सुरळीत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

धोक्याची घंटा कायम

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेले दोन वर्षांतील सर्वांत कमी मार्च २०२२ मध्ये नोंदविल्या गेली. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णही कमी आहेत. तीनच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, नागरिकांनी काळजी न घेतल्यास कधी कोरोनाचा उद्रेक होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दोन वर्षानंतर परिस्थिती सुधारली असली तरी धोक्याची घंटा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT