Katepurna Dam Water Storage 71-11 percent  sakal
अकोला

Katepurna Dam Water Storage : अकोला शहराची पाण्याची चिंता मिटली; काटेपूर्णा प्रकल्पामध्ये ७१.११ टक्के जलसाठा

काटेपूर्णा प्रकल्पावरील महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७६ मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी एका दिवसांत २१ टक्क्यांनी वाढली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : काटेपूर्णा प्रकल्पावरील महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७६ मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी एका दिवसांत २१ टक्क्यांनी वाढली. मंगळवारी सायंकाळी प्रकल्पामध्ये ५० टक्के साठा होता तो आज बुधवारी वाढून ७१.११ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हा जलसाठा पाहता अकोला शहरासह मूर्तिजापूर व ६४ खेडी गावांची वर्षभराची तहान भागली आहे. आगामी पावसाचे दिवस लक्षात घेता सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत.

अकोला शहराला पाणी पुरवठ्यासाठी वर्षभराकरिता २४.०४ दलघमी एवढे पाणी लागते. तर याच काटेपूर्णा प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी ७ दलघमी पाण्याची गरज आहे. आजच्या स्थितीत धरणातील साठा ६१.४०९ दलघमी आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वजा जाता ३२ दलघमी पाणी शिल्लक उरते.

त्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. काटेपूर्णा धरण क्षेत्रात आजपर्यंत एकूण ४१६ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. मंगळवारी रात्रभरात ७६ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणात आजच्या स्थितीत ६१.४०९ दलघमी साठा उपलब्ध आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी ५ वाजता प्रकल्पाचा दरवाजा ५ से.मी ने उघडण्यात आला आहे. प्रकल्पातून ४.१० क्यूमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन दगडपारवा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘दगडपारवा’चा एक दरवाजा उघडला

दगडपारवा लघु प्रकल्पाची पाणी पातळी ३१६.७० मीटर असून, त्याचा साठा ८.२६ दलघमी त्याची टक्केवारी ८१.०५ आहे. दगडपारवा प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुचीनुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेर ७९.९१ टक्के पाणीसाठा असणे निर्धारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Flood : पंजाबमध्ये पुरामुळे हाहाकार, १ हजार गावे बाधित, ३ लाख लोकांचे स्थलांतर; लाखो एकर शेतीचे नुकसान

Satara Crime: 'मोबाईल चोरांची टोळी अटकेत'; साताऱ्यातील चोऱ्या उघड, मोबाईलसह चारचाकी जप्‍त

Maratha Reservation: 'स्वतंत्र गॅझेटमधून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न'; मराठा समाज समन्वयकांचा आरोप; पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका जाहीर करावी

OBC Community Organization: 'लोणंदमध्ये गुरुवारपासून साखळी उपोषण'; ओबीसी समाज संघटनेचा इशारा; मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये

उजनी धरणात १२२ टीएमसी पाणी! २० जूनपासून धरणातून सोडले पुन्हा एकदा धरण भरेल इतके पाणी; धरणाच्या पाण्यावर दररोज २ कोटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती

SCROLL FOR NEXT