Lalaji Govardhan Sharma Death  sakal
अकोला

Lalaji Govardhan Sharma Death : लालाजींच्या एक शब्दावर मी पत्रावर सही करायचो - उपमुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा लालाजी हक्काने मला म्हणायचे की पत्रावर सही कर; त्यामुळे मी पत्र न वाचताच स्वाक्षरी करायचाे; कारण हे काम जनहिताचेच असेल, याचा मला विश्वास हाेता,

अशा शब्दात तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आमदार गाेवर्धन शर्मा यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. शनिवारी (ता. ४) लालाजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ४) भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे आमदार शर्मा यांच्या आळशी प्लाॅट येथील निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले. त्यासोबतच श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी फडणवीस यांनी स्व. शर्मा यांचे कुटुंबिय पत्नी गंगादेवी शर्मा, पूत्र कृष्णा शर्मा, अनुप शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

यावेळी स्व. शर्मा यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. याठिकाणी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, आकाश फुंडकर, राजेंद्र पाटणी, वसंत खंडेलवाल, आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

फडणवीसांनी अशी व्यक्त केली शोकसंवेदना

आमदार गाेवर्धन शर्मा उर्फ लालाजी हे जनसामन्यांचे नेते हाेते. लाेकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द हाेती. ते जिंदादिल, संघर्षशील नेतृत्व हाेते. प्रथम नगर परिषदेत १० वर्षे व नंतर तर सहा वेळा ते आमदार म्हणून विधिमंडळात हाेते. कतृत्वाने त्यांनी आपली वेगळी प्रतिमा तयार झाली. संपर्क काैशल्यामुळे त्यांना काेणीच नाही म्हणत नसे. मंत्रीपद नकाे, मला जनतेमध्येच जाऊन काम करायचे असे आपल्या नेत्यांना सांगणारे ते एकमेव आमदार असतील.

मी अनेकदा त्यांच्या साेबत रेल्वेत प्रवास केला. संपूर्ण रेल्वेत ते प्रवाशांची गप्पा मारायचे. प्रवाशांना ते हवेहवेसे वाटत. २५ वर्षे विधिमंडळात त्यांच्यासाेबत काम केले. लालाजींशिवाय अकाेल्याची कल्पना आम्हाला करवत नाही. त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल.

नि:स्वार्थ नेता कसा असावा, हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. मिळलेले मंत्रीपद साेडून दिले. उमेदवारीसाठी ते नाही म्हणायचे. मात्र त्यांनी निवडणूक लढावी, यासाठी आम्ही आग्रह धरायचाे. सत्तेचा लाेभ नव्हता. लाेकांचे काम करीत राहायचे. लालाजी २४ तास जनतेसाठी उपलब्ध असायचे. यालाच ‘मॅन टू मॅन कनेक्ट’ म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

IPL 2026 Live: साई सुदर्शनने शतक झळकावले, RCBच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम! GT ने उभे केले तगडे लक्ष्य

शिक्षण संचालकांचे आदेश! अतिरिक्त शिक्षकांच्या पगारीचा मार्ग मोकळा; शिक्षणाधिकारी, उपसंचालकांच्या लॉगिनमधून पगार बिले पाठविण्याचे आदेश, हा बदल एकदाच

Paytm Payments Bank: बँकिंग क्षेत्रात खळबळ! पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT