Leader of Swabhimani Shetkari Sanghatana Ravikant Tupkar has demanded the Chief Minister to compensate for the untimely loss 
अकोला

अवकाळीच्या नुकसानीची भरपाई द्या : रविकांत तुपकर

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यात १८ व १९ मार्चला अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी तुरळक गारपीट देखील झाली. यामुळे ऐन काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
या संदर्भात रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन केले आहे. या निवेदनात नमूद आहे की, मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षीदेखील खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच बोगस बियाणे यामुळे दुबार -तिबार पेरणी करावी लागल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यावर्षी रब्बीतील पिके चांगली असल्याने याच पिकांकडून शेतकर्‍यांना आशा होती. गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह इतर पिके ऐन काढणीला आलेली असताना जिल्ह्यात १८ व १९ मार्च रोजी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी तुरळक गारपीट देखील झाली आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना या नुकसानीची भरपाई न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे हतबल होऊन आत्महत्येच्या मार्गाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. या कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. स्वाभिमानीचे राणा चंदन, शेख रफिक शेख करीम, राजेश गवई, महेंद्र जाधव, संतोष गवळी या पदाधिकार्‍यांनी मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

राणा चंदन यांनी तात्काळ मोताळा तहसीलदार समाधान सोनुने यांना फोन करून पंचनामे करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. राणा चंदन यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कृषी अधिकारी, तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करण्यास सुरवात केली. बाबूराव सोनुने यांच्या शेतात अडीच एकर मका उद्ध्वस्त झाल्याने त्यांना स्वाभिमानी’च्या पदाधिकार्‍यांनी धीर दिला. तात्काळ नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात लवकरच आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा राणा चंदन यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT