leopard trapped  sakal
अकोला

विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

गव्हाण परिसरात वनविभागाचा रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस

मुशीर खान कोटकर

देऊळगाव राजा : तालुक्यातील खल्याळ गव्हाण शिवारात एका शेतकऱ्याच्या विहिरीत रात्री दरम्यान पडलेला बिबट्या आज (ता.७) दुपारी बुलढाणा येथील रॅपिड रेस्क्यू युनिट व देऊळगाव राजा वनविभागाच्या टीम ने सुखरूप बाहेर काढले, दरम्यान परिसरात बिबट्या च्या सहवासाने खल्याळ गव्हाण वासियां मध्ये भीतीचे वातावरण होते.

leopard trapped

खल्याळ गव्हाण शिवारात मागील काही आठवड्यापूर्वी बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले होते परिसरात उस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याच्या भीतीने ऊस तोडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मजूर मिळत नव्हते आज सकाळी खल्याळ गव्हाण येथील सुखदेव उत्तम बनकर यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पाण्यात पॉहतांना दिसून आला, दरम्यान राष्ट्रवादी किसान सेनेचे श्रीकृष्ण दंदाले यांनी तहसीलदार श्री धनमने व स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस डुबे यांना सदर माहिती दिली या नंतर वन अधिकारी खल्याळ गव्हाण येथे पोचले दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी श्री डुबे यांनी उपवन संरक्षक यांच्याशी संपर्क करून माहिती दिली.

leopard trapped

विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बनकर यांच्या विहिरीकडे एकच गर्दी केली, या अगोदर परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला होता व सदर बिबट्याने शेतकऱ्याचे पशू फस्त केले होते, विहिरीत पडलेला बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यासाठी उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनात रॅपिड रेस्क्यू युनिट व देऊळगावराजा वन विभागाची टीम पिंजरा व इतर साहित्य घेऊन खल्याळ गव्हाण ला पोचली, परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पिंजरा विहिरीत सोडण्यात आला व सुमारे तासाभरात पाण्यात पडलेला बिबट्या पिंजर्‍यात सुखरूप कैद करण्यात आला, सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस डुबे, वनपाल आर बी पवार वनरक्षक बिल्लारी श्री मांडे श्री सलामे वनरक्षक श्री काकड,श्री सानप, रॅपिड रेस्क्यू युनिटचे श्री मडावी व इतर कर्मचारी यांनी बिबट्याचे फयसीचाल रेस्क्यू करून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Canada Trade War: अमेरिकेचा कॅनडाला मोठा आर्थिक धक्का; ५०% टॅरिफ लागू, कार्नींचा प्रत्युत्तराचा इशारा, म्हणाले...

IND vs SL 2nd Test: कुलदीप यादव की सारांश जैन? गौतम गंभीरच्या एका वक्तव्याने वाढलं सस्पेन्स; दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा मोठा निर्णय?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना किती गाठी बांधायच्या असतात? जाणून घ्या यामागची खास मान्यता

Mumbai Accident: मुंबईत हिट-अँड-रनचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला बाईकने उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

पुण्यात काल नेमकं काय घडलं? COEP तील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी जारी केलं निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT