क्राईम न्यूज नांदेड 
अकोला

सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः घराबाजुला राहणाऱ्या सुनेसोबत वाद करुन तिला घाटसलेट टाकून पेटविणाऱ्या आरोपी आतेसासुला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबत पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाचा कठोर कारावास सुद्धा आरोपी आतेसासूला भोगावा लागेल. घटनेतील फरार दुसरी आरोपी अनिता राजू धवसे हिच्या विरुद्धा पकड वॉरंट जारी केला आहे. (Life imprisonment for mother-in-law who burns doughter in law)


घटनेची हकीकत अशी की, मृतक सोनू संजय इंगळे (रा. फेटा, ता. बार्शीटाकळी) तिच्या पती सोबत राहत होती. तिच्या घराच्या बाजुला तिची आतेसासु आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे राहत होत्या. २७ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी ९ वाजता आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांचे मृतक सोनू संजय इंगळे हिच्या सोबत भांडण झाले होते. त्या कारणावरुन आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांनी मृतक हिच्या अंगावर घासलेट टाकून तिला जाळले. त्याच दिवशी मृतक सोनू संजय इंगळे हिला सवौपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

घडलेल्या घटनेबाबत तिने पोलिसांकडे मृत्यूपुर्व बयान दिले होते. तसेच घटनेची माहिती तिचे वडिल कैलास कचरु वानखडे यांना सुद्धा सांगितली. त्यामुळे मृतक हिच्या मृत्युपूर्व जबानी वरुन पोलिस स्टेशन पिंजर येथे आरोपी आतेसासू व तिच्या मुलीविरोधात कलम ३०२, ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आरोपी बेबी भारत श्रृंगारे हिचा अटक करण्यात आल्यानंतर तिचा जामीन मिलाला नाही व आरोपी अनिता राजू धवसे ही फरार झाली. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. मृतक महिलेची साक्ष, साक्षिदारांचे जवाब व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांनी आरोपी बेबी श्रृंगारे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यासोबतच पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सुनावणी दरम्यान संतोष शंकर मोहिते व मृतक सोनू हिचा पति संजय महादेव इंगळे हे सरकार पक्षास फितूर झाले. त्यामुळे संबंधितांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना सुनावणी अधिकारी प्रकाश खाडे यांनी सहकार्य केले.


Life imprisonment for mother-in-law who burns doughter in law

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणेकरांची पहाट पावसाने उजाडली! साडेसहापर्यंत मुसळधार पाऊस; कोणत्या भागांत कोसळल्या जोरदार सरी?

November 1 New Rules : नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू; गॅस सिलिंडर, दूध, सीएनजी महागले, FASTag मध्येही बदल

Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला! कुठे शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको, तर कुठे महिलांचे टाकीवर ‘शोले स्टाइल’ आंदोलन

LPG Cylinder Price Hike : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका ! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील नवे दर

Pune Weather Update: पुणेकरांसाठी हवामानाची गुड न्यूज! तापमानात घट होणार, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT