अकोला

वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी ‘सजीव कुंपण’

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अल्प खर्चामध्ये सजीव कुंपणाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांसह इतर बाबींपासून पिकांचे संरक्षण करणे शक्य आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर श्रमदानाच्या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल एक किलोमीटर लांबीचे ‘सजीव कुंपण’ उपुक्त प्रजातींची बीजारोपण पद्धतीने लागवड करून निर्माण करण्यात आले आहे.

जागतिक वसुंधरा दिवस अनुषंगाने अकोला वनविद्या महाविद्यालयाने आमचे विद्यापीठ आमची जबाबदारी या मोहिमेअंतर्गत, कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांचे प्रेरणेने तसेच मध्यवर्ती संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. सुधीर वडतकर, वनविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एच. एन. सेठी व वनविद्या विभागप्रमुख डॉ. एस. एस. हरणे यांच्या मार्गदर्शनात प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून प्रायोगिक तत्त्वावर ‘एक किलोमीटर विद्यापीठ सजीव कुंपण घनसुरक्षा पट्टा’ मध्यवर्ती संशोधन केंद्राचे सहयोगाने प्रत्यक्ष साकारला.

सजीव कुंपण सुरक्षापट्टा निर्माण करण्याकरिता सागरगोटी, चिलाटी, मेहंदी, बोर, बांबू या काटेरी वृक्षांचा समावेश केला गेला. या श्रमदानामध्ये वनविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी कडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, वनविद्या महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसी ऑफिसर डॉ. दारासिंग राठोड, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे उपसंचालक तायडे, डॉ. सचिन भोपळे व सुधाकर चौधरी, तुंबडे यांनी सहभाग नोंदविला.

श्रमदान कार्यक्रमाचे सूत्र सजीव कुंपण संशोधन प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी सांभाळले. तर, अनंत देशमुख, इरतकर यांच्या देखरेखीत सजीव कुंपण सुरक्षापट्टा निर्माण करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT