लॉकडाउन ई सकाळ
अकोला

आठवडाभरातच पुन्हा लॉकडाउन, आता चारच्या आत घरात

सकाळ वृत्तसेवा

अकाेला ः जिल्ह्यात काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी लागू करण्यात आलेले कठाेर निर्बंध आणखी शिथिल केल्यानंतर नागरीक अनिर्बंध झाल्याचे दिसून आले. काेराेना विषाणूचा नायनाट झाल्याप्रमाणे नागरीक वापरत होते. बाजारापेठेत नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी हाेती. अनेकांनी मुखपट्टी (मास्क) न लावल्याचे दिसून आले. परिणामी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व व्यवहार करण्यास मिळाले सुट आठवडाभरातच कमावून बसलो आहे. आता पुन्हा दुपारी चारच्या आता घरात ही परिस्थिती राज्य शासनाच्या नव्या नियमांमुळे ओढवली आहे. (Lockdown again within a week in Akola, now home within four)


कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मेमध्ये कडक टाळेबंदी जाहीर केली हाेती. त्यानंतर काही दिवस जीवनावश्यक साहित्याची दुकाने अटी-शर्तींसह सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. साेमवारपासून (ता.२१ जून)तर सर्व दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात अद्यापही कोरोना लाट नियंत्रणात न आल्याने आणि सुट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचा मुक्त संचार धोकादायक वाटत असल्याने शासनाने शुक्रवारी सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता विके एण्डचे दोन दिवस वगळल्यानंतर पुन्हा दुपारी ४ वाजतानंतर बाजारपेठा बंद होणार आहेत.



सरकारी यंत्रणांचे नियंत्रण नाही
जिल्हाधिकारी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी हाेत नसल्याने महसूल, पाेलिस, महापािलका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी हाेताना जिल्ह्यात दिसली नाही. महानगरपालिका क्षेत्र तर कोरोना मुक्त झाल्यासारखेच वाटत होते. महानगरपालिका, जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसले नाही. त्यामुळे या यंत्रणांवरही कुणाचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Lockdown again within a week in Akola, now home within four

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT