The lockout has been maintained till March 16 in view of the outbreak of corona in Buldana district 
अकोला

येत्या आठवड्यातही टाळेबंदी ‘जैसे थे’; सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार उघडे

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता 16 मार्चपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी 8 मार्चला सकाळी 8 वाजेपासून ते 16 मार्चचे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी 6 मार्चला उशिरा काढला आहे.
 
आदेशान्वये जिल्ह्यात सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दूध विक्रेते, दूध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यात सायंकाळी 6 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 50 टक्के संख्या ग्राह्य धरून सुरू राहतील. 

सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 50 व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये बँड पथकातील सदस्यांचा समावेश असेल. अंत्यविधी करिता 20 व्यक्तींना परवानगी असेल. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दी नियंत्रण करून हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. 

कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन याठिकाणी होणे आवश्यक आहे. गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ 5 व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलिस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT