homeguard sun stroke
homeguard sun stroke sakal
अकोला

Akola News : दोन्ही होम मिनिस्टर अकोल्यात, अन् होमगार्ड कोसळले रस्त्यावर

योगेश फरपट

अकोला - महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर आहेत. इकडे लोकसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी नागपूर ग्रामिणमधून आलेल्या होमगार्डची मात्र मोठ्‍या प्रमाणात गैरसोय झालेली दिसून आली. रखरखत्या ४४ डिग्री सेल्सिअसच्या तापमानात होमगार्ड जवान रस्त्याच्या कडेला सावलीचा सहारा घेत होते. त्यात दोघांना उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले.

अकोल्यात आज ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यात उष्ण वारे वाहत असून, इतर जिल्ह्यातून आलेले होमगार्ड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पुलाच्या सावलीचा आधार घेत बसले होते. त्यांच्यापैकी काहींना भोवळ येत ते खाली कोसळले काहींना दवाखान्यात न्यावे लागले. पण, इतके सगळे होत असताना जिल्हा प्रशासन, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष अधोरेखित होत होते.

सकाळी ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्यांच्याकडे कोणीच लक्ष का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा सर्व प्रकार गंभीर असाच आहे. आलेल्या चारशे ते पाचशे होमगार्डपैकी कोणालाच नाश्ता, चहा, जेवण आदीची सोय जिल्हा प्रशासन, पोलिस विभागाने केली नसल्याची माहिती नागपूर येथून आलेल्या होमगार्ड जवानांनी दिली.

पोलिस विभागाचे दुर्लक्ष येथे अधोरेखित होत असून, रखरखत्या उन्हात निवडणुकीत बाधा येऊ नये म्हणून आलेल्या जवानांच्या प्रती इतका निष्काळजीपणा का केला गेला याची चौकशी होण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपये निवडणुकीच्या नावाने खर्च होतात. पण, तैनातीसाठी आलेल्या जवानांची सोय मात्र केल्या जात नसल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

निवडणूक कर्तव्यावरील होमगार्ड रस्त्यावरच्या रखरखत्या उन्हात बसले असताना त्यांची सावलीत सोय करण्याची गरज होती. इतकेच नाही तर त्यांच्या जेवण आणि पाण्याची सोय का केल्या गेली नाही. केवळ त्यांच्या नावावे बिल काढण्यात येतील काय, असा प्रश्न इतर जिल्ह्यातून आलेल्या होमगार्ड जवानांना पडला होता. पोलिस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने होमगार्ड जवान तैनातीसाठी बोलविण्यात आले. पण, त्यांची सोय करण्यात प्रशासन व यंत्रणेला वेळ मिळाला नाही की त्यांनी दुर्लक्ष केले अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांची माणूसकी हरवली!

मंगळवारचे शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर येथून होमगार्ड तैनातीसाठी बोलविण्यात आले. पण, त्यांची योग्य ती सोय करण्यात अकोला जिल्हा प्रशासन व अकोला पोलिस यांनी निष्काळजीपणा केल्याचे चित्र आहे. देशाचे (अमित शाह), राज्याचे गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) अकोल्यात भाजप प्रचारासाठी येत आहे. अशा वेळी अकोल्यात वाढत्या उन्हात होमगार्ड जवानांची गैरसोय होत असेल तर होमगार्ड जवानांकडे माणुसकीच्या नात्याने पाहण्याची शिकवण अधिकाऱ्यांना कोण देणार असा प्रश्न आहे.

काय म्हणाले जवान...

सकाळी पाच वाजेपासून आलो मात्र साधे पाणी सुद्धा विचारले नाही. जनावरापेक्षाही बेहाल आमचे अकोला बंदोबस्तादरम्यान होत आहे.

- क्रिष्णा कोयावरे

नागपूरहून २०० किलोमिटरचे अंतर पार करून आलो. सकाळपासून चहा,नाश्ता, जेवण काहीच नाही. राहण्याची कुठेही व्यवस्था करण्यात आली नाही. अकोल्यात हेच हाल होत असतील तर आम्ही बंदोबस्त करणार नाही.

- अमोल न्याहारे

आमच्यासोबत काही लेडीज जवान सुद्धा आहेत. त्यांची तर मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. रस्त्याच्या कडेला आसरा घेवून आम्ही उभे आहोत.

- देवला पवार

बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डची काही प्रमाणात गैरसोय सुरुवातीला झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तातडीने त्यांची व्यवस्था करण्यात आली असे अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांनी सांगितले. बंदोबस्तासाठी आलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याची गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता घेवू.

- रामप्रतापसिंग जाडोन, सामान्य निरीक्षक, लोकसभा निवडणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT