Lonar Akola News: The mother was frightened by the loss of her three-year-old son, who was found 21 hours later 
अकोला

घराच्या अंगात खेळणारा तीन वर्षांचा बालक झाला गायब, अपहरणाची चर्चा अन् सापडला शेतात

श्याम सोनुने

लोणार (जि.बुलडाणा)  : घराच्या अंगात खेळणारा तीन वर्षीय बालक बघता-बघता आईच्या डोळ्यापुढून गायब होतो...शोधाशोध सुरू होते...आईच्या जीवाची घालमेल सुरू...जीववर खाली होत असताना तब्बल २१ तासानंतर ‘त्या’ माऊलीचा जीव भांड्यात पडतो. सर्वच सुटकेचा निश्वास टाकतात. ही घटना आहे. लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील.

पिंपळनेर येथील फकिरा दराडे यांचा ३ वर्षाचा मुलगा कार्तिक रविवारी घरा समोरील अंगणात खेळत असताना अचानक गायब झाला. त्याचा नातेवाईकानी सर्वत्र शोध घेतला. दिवस भर शोधाशोध सुरू होती. अखेर मुलाच्या हरवल्याची माहिती लोणार पोलिस स्टेशनला देण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक अजहर शेख यांच्यासह पोलिस ताफा तत्काळ घटना स्थळी रवाना केला. मुलगा हरवल्याची माहिती सर्व समाज माध्यमावर व्हायलर करण्यात आली. अखेर तब्ब्ल २१ तासांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी पिंपळनेर येथील ज्ञानेश्वर सानप यांच्या शेतात सानप यांचा मुलगा श्रीकांत सानप याला कार्तिक आढळून आला.

या बाबत ची माहिती सदर मुलाच्या नातेवाईकाना व लोणार पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्या मुलाला ग्रामीण रुग्णालय लोणार येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचाराकरीत मेहकर इथे रवाना केले. या बालकाची प्रकृती चांगली आहे.

अपहरणाची चर्चा
तीन वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र भीतीपोटी अपहरणकर्त्याने बालकास परत शेतात आणून सोडले, अशी पिंपळनेर ग्रामस्थ दबक्या आवाजात चर्चा करत आहे. हा बालक खरंच हरविला होता की, अज्ञात आरोपीने अपहरण केले याचा शोध घेणाचे आव्हान लोणार पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT