Dr Sanjay Kute Sakal
अकोला

...तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना वार्‍यावर का सोडता ?

राज्यातील आघाडी सरकारचे लखीमपुर घटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांवरील प्रेम बेगडी आहे. जर तुम्हाला शेतकर्‍यांची एवढीच काळजी आहे.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा - राज्यातील आघाडी सरकारचे लखीमपुर घटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांवरील प्रेम बेगडी आहे. जर तुम्हाला शेतकर्‍यांची एवढीच काळजी आहे, तर महाराष्ट्रातील शेतकर्‍याला मदत न करता वार्‍यावर का सोडता? असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित केला.

येथील राजे गार्डन परिसरात भाजपचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू होता. या वर्गाच्या समारोप समारंभात डॉ. कुटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आमदार ड. आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, माजी जिल्हाध्यक्ष मोहन शर्मा, विजय कोठारी, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजप नेते योगेंद्र गोडे, तोताराम कायंदे, संतोष देशमुख, नंदू अग्रवाल उपस्थित होते.

श्री. कुटे पुढे म्हणाले की 2014 पूर्वीचा भारत आणि 2021 नंतरचा भारत यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. भ्रष्टाचारविरहित सरकार, अराजकतेचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न व देशाला प्रगतिपथावर देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू आहे. विरोधक मात्र खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. हे कार्यकर्त्यांनी खपवून घेऊ नये. केवळ सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून देशात अराजकतेचे वातावरण तयार करण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरण्याचा खटाटोप व्यर्थ आहे. सत्ता गेल्यामुळे काँग्रेस व त्यांचे साथीदार विचलित झाले आहेत. कार्यकर्त्यांनी देखील यापुढे भाजपची कामगिरी जनतेसमोर ठेवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पक्ष हिताला प्राधान्य द्या

आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. काम करणार्‍यांनी अपेक्षा ठेवणे उमेदवारी मिळविणे यात गैर काही नाही. परंतु एखाद्यावेळी उमेदवारी न मिळाल्यास पक्षासोबत केली जाणारी बेइमानी अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा दम डॉ. कुटे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT