अकोला

Agriculture: ‘स्वाक्षरी’ नसल्याच्या कारणाने विमाभरपाई रेंगाळली ! विमा कंपनी आग्रही; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

पात्र शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून लोकल क्लायमेट घटकाखाली नुकसान भरपाईची दिली जाणार आहे. मात्र, ही भरपाई रेंगाळण्यासाठी तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Akola Crop Insurance: गेल्या काळात मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून लोकल क्लायमेट घटकाखाली नुकसान भरपाईची दिली जाणार आहे. मात्र, ही भरपाई रेंगाळण्यासाठी तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पंचनाम्यांवर कृषी सहायकांची स्वाक्षरी नसल्याने या स्वाक्षरीचा आग्र धरल्या जात असल्याने हा पेच सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.


अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात यावेळी सुमारे ३० हजारावर शेतकऱ्यांनी इंटीमेशन विमा कंपनीला सादर केल्या होत्या.

या शेतकऱ्यांना लोकल क्लायमेट घटकाखाली विमा काढलेल्यांकडून भरपाई मिळू शकते. यासाठी तेव्हा सात दिवसांच्या आत पंचनामेही करण्यात आलेले आहेत. मात्र, या पंचनाम्यांच्या कागदपत्रांवर कृषी सहायकांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत.

पंचनामा अहवालावर कृषी अधिकारी असा उल्लेख असल्याने कृषी सहायकांनी त्या जागेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. याबाबत संघटनांनी कृषी विभागाला निवेदने देऊन आपली भूमिकाही मांडलेली आहे. मात्र, ही स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा आता विमा कंपनी उपस्थित करीत आहे. (Latest Marathi News)

मदत देण्यासाठी पंचनाम्यांच्या कागदपत्रांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी हवी. असा आग्रह केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची मदत रेंगाळत चालली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा समितीपुढे हा मुद्दा ठेवला जाणार आहे. त्याठिकाणी जिल्हाधिकारी जे आदेश देतील त्यावर मदतीबाबतचा निर्णय अवलंबून आहे.

स्वाक्षरीचा मुद्दा ऐरणीवर
नुकसान होऊनही पीकविमा भरपाई मिळत नसल्याची बाब अनेक जिल्ह्यात घडते आहे. यामागे कृषी सहायकांनी पंचनाम्यांवर बऱ्याच तालुक्यात स्वाक्षरी केलेल्या नाहीत. त्यांच्या मागण्यांसाठी याबाबत ते प्रशासनासोबत संघर्ष करीत आहेत. (Latest Marathi News)

कृषी अधिकारी उल्लेख असल्याने आम्ही पंचनामे करून देऊ मात्र, स्वाक्षरी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. या मुद्याचा पेच सोडवण्याची गरज आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांकडून प्रशासनाला स्वाक्षरी हवी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत एकत्रित निर्णयाद्वारे तातडीने तोडगा काढण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT