prakash ambedkar  esakal
अकोला

Prakash Ambedkar : मविआने मसुदा मान्य केला, त्याचे स्वागत! आता जागावाटपाचा समझोता सांगा

वंचित बहुजन आघाडीच्या सर्व ३९ मुद्द्यांना स्वीकारण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - वंचित बहुजन आघाडीच्या सर्व ३९ मुद्द्यांना स्वीकारण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र, आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा जागा वाटपाबाबत काय समझोता झाला, हे लवकरात लवकर जाहीर करावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना केली.

दोन दिवसांत महाविकास आघाडीने हा निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ते शुक्रवारी अकोल्यात शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्यानंतर वंचितकडून महाविकास आघाडीला ३९ मुद्द्यांचा मसुदा देण्यात आला होता.

आता वंचितचा मसुदा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वीकारला असल्याचं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं आहे. आंबेडकर यांनी काँग्रेसच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आंबेडकर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिघांनी आपापल्या पक्षाचा मसुदा द्यावा. म्हणजेच एकत्र येण्यासाठी त्यांचे कोणते मुद्दे आहेत. हे आम्हाला लक्षात येईल. पुढचा निर्णय घेता येईल.

या तिन्ही पक्षांत जागावाटपाचा जो समझोता झालेला आहे. जागावाटपात कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा गेल्या, याची माहिती द्यावी. म्हणजेच आम्हाला राहिलेल्या किंवा कोणत्या जागा मागाव्यात, याबाबत चर्चा करता येईल. महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी कोणत्याही माध्यमातून आमच्याशी संवाद साधावा.

म्हणजेच आम्हाला ज्या जागा पाहिजेत, याचा आराखडा लवकर देता येईल. म्हणजेच सीट वाटपाचं काय ते लवकर ठरवलं जाईल. मात्र, दोन दिवसांत त्यांनी हा निर्णय घ्यावा. हा अल्टिमेटम नाही, पण विनंती आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

जागांचे ॲग्रिमेंट शेअर करावे

प्रकाश आंबेडकरांनी विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेल्यानुसार त्यांनी जागांचे ॲग्रिमेंट शेअर करावे. आम्ही अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही. केवळ निमंत्रक म्हणून बैठकीत बसत असतो, असेही आंबेडकर म्हणाले. आम्ही त्यांच्या जागावाटपाच्या समझोतामध्ये अद्याप नाही.

त्यांनी एकमेकांना जागावाटप शेअर केला, तो आम्हाला शेअर करावा. याबाबत त्यांनी आमच्याशी कसं बोलावं, हे त्यांनी ठरवावं. आम्हाला किती जागा हव्या आहेत. हे अद्यापही सांगू शकत नाही. यापूर्वी दिलेला १२ जागांचा फॉर्म्युला हा चर्चेचा प्रस्ताव होता असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT