अकोला

बहुजन महासंघाचे संस्थापक, माजी कॅबिनेट मंत्री पवार यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

अकोला : माजी मंत्री तथा बहुजन महासंघाचे संस्थापक मखराम पवार यांचे मुंबई येथील लीलावती रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान रविवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांची प्राण ज्योत मालवली.

मखराम पवार हे भारिप बहुजन महासंघ या पक्षावरच पहिल्यांदा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ ते २००४ या कार्यकाळात विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भारिप बहुजन महासंघाच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद आले होते. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मखराम पवार यांची वर्णी लागली होती.

भारिप बहुजन महासंघामधील अंतर्गत वादातून मखराम पवार यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडून आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर २००९ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि पुन्हा २०१३ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यानच्या काळात अकोला जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मखराम पवार यांचा मुलगा सतीश मखराम पवार यांनी जांब वसू जि. प.सर्कल मधून भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती.

असा झाला भारिपचा नामविस्तार

मखराम पवार यांनी बहुजन महासंघ ही सामाजिक संघटना स्थापन केली होती. त्यांनी या संघटनेपासून राजकीय वाटचाल सुरू केली होती. २१ मार्च १९९३ रोजी शेगाव येथे निळू फुले, राम नगरकर यांच्या उपस्थितीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘भारिप’ आणि ‘बहुजन महासंघ’चे संयुक्त अधिवेशन झाले‌. या अधिवेशनात मखराम पवार यांनी बहुजन महासंघ ही संघटना ‘भारिप’मध्ये विलीन केली. पुढे भारिपचा नामविस्तार ‘भारिप बहुजन महासंघ’ असा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT