crime
crime sakal
अकोला

मालेगाव : चिखलीच्या इसमाचा मालेगावात खून

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील आठवडी बाजार परिसरात २५ आक्टोबर रोजी सकाळी चिखली जिल्हा बुलढाणा येथील ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या संदर्भात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकास पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. हा प्रकार मालेगाव येथील वेशा व्यवसाय प्रकरणी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

कुणीतरी अनोळखी इसम आठवडी बाजार परिसरात मृतावस्थेत पडल्याची माहिती २५ डिसेंबर रोजी सकाळी मालेगाव पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार धुमाळ, ना.पो.काँ. गजानन झगरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सदर मृतक इसम हा अनोळखी असल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती. पोलिसांनी केलेल्या गुप्त माहितीवरून त्यांना नवीन मालेगाव परिसरात राहणारा आकाश डोंगरे यांचा संशय आला. त्याचा शोध घेण्यासाठी गजानन झगरे त्याच्या घरी जात असताना आकाश डोंगरे याने लहुजी पुतळ्याजवळ त्यांना बघितले व पळ काढला.

झगरे यांनी गल्ली बोळातून सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला पकडून जेरबंद केले. अनोळखी मृतकाची पोलिसांनी दोन तासात ओळख पटवून फोनवरून त्याच्या नातेवाईकाशी संपर्क केला. मात्र, त्याच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो प्रचंड दारुडा होता. गेल्या आठ-दहा वर्षापासून तो बाहेरच होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्याच्या नातेवाईकांनी त्यांचा त्याचेशी काहीच संबंध नसून ते फिर्याद सुद्धा देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सायंकाळपर्यंत त्याचा पी.एम. सुद्धा झाला नव्हता.

तो चिखली जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून, त्याचे नाव स्वरूपचंद निकमचंद जैन, वय ४२ वर्षे होते. तो २४ आक्टोबर रोजी मालेगाव येथे आला होता. त्याने २४ तारखेला रात्री याच परीसरात असलेल्या देशी दारुच्या दुकानात प्रचंड दारू ढोसली. हे चित्र सदर दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर तो तेथील वेशा व्यवसायासी संबंधात मुलीसोबत कुकर्म करण्याच्या प्रयत्नात असताना मालेगाव येथील आकाश डोंगरे वय २८ याचेशी वाद झाला. दोघेही प्रचंड दारू प्यालले असल्याने आकाशने त्याला लोटून दिले. त्यामुळे तो दगडावर पडला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असे आकाशने त्याच्या बयानात नोंदविले आहे. आकाश डोंगरे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलिस करीत आहेत.

स्मशानभूमीच्या मागे चालतो देहविक्रय

मालेगाव येथील आठवडी बाजार परिसरात हिन्दू स्मशानभूमीच्या मागे काही दलालांच्या मार्फत चोरून वेशा व्यवसाय चालतो. तेथे दूरदूरून काही मुली या व्यवसायासाठी येतात. त्यामुळे काही आंबट शौकीन सुद्धा येथे येत असतात. या व्यवसायामधून या आधीही मारामाऱ्या, चोऱ्या, फसवणुकीचे अनेक अघटीत प्रकार घडले असून पोलिसांनी अनेक वेळा संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. तेथे असलेल्या तात्पुरत्या राहुट्या देखील पोलिसांनी उखडून टाकल्या आहेत. मात्र, तरीहा हा वेशा व्यवसाय लपून छपून पोलिसांच्या चोरून सुरुच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT