MANA Railway Station 4 to 5 feet pit under railway track was carried Trains delayed 7 hours sakal
अकोला

MANA Railway Station : रेल्वे रुळाखालील भराव गेला वाहून; 4 ते 5 फूट खड्डा; दोन्ही बाजूंच्या गाड्यांना 7 तासांचा विलंब

माना परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे रुळाखालील भराव वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा

माना : माना रेल्वे स्टेशनलगत रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेला. रेल्वे रुळाखाली 4 ते 5 फूट खड्डा पडला असून यातून पाणी वाहत असल्याचे चित्र होते. ही घटना सोमवार, 10 जुलै रोजी दुपारी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

माना परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे रुळाखालील भराव वाहून गेला. रेल्वे विभागाने दोन्ही बाजूूंची वाहतूक थांबविल्याने या मार्गावरील गाड्यांना 6 ते 7 तासांचा विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

जिल्ह्यातील माना परिसरात झालेल्या पावसामुळे माना

रेल्वे स्टेशननजीक हिरपूर गेट येथील क्रमांक 35/46 पोलजवळ अप-डाऊन रेल्वे रुळाखाली असलेला भराव वाहून गेला. त्यामुळे रुळाखाली 4 ते 5 फूट खोल खड्डा पडून पाणी वाहायला लागले.

ही बाब स्थानिक गावकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेच्या कर्मचार्‍यांना सांगितली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने संदेश देत अप-डाऊन मार्गावरील वाहतूक थांबविली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी रेल्वे रुळाखाली भराव वाहून गेला तेथे अंडरपासचे काम सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने काम करताना अडथळा येत आहे. रेल्वे रुळाखाली भराव घालून रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याकरिता किमान 3 ते 4 तासांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे विभागाने साडेआठच्या सुमारास कामाला सुरूवात केली होती.

अप-डाऊन रेल्वे वाहतूक प्रभावित

अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या हिरपूर गेटनजीक अंडरपासचे काम सुरू आहे. येथील रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्यानंतर रेल्वे विभागाने दोन्ही बाजूची वाहतूक तत्काळ थांबविली. रुळाखाली भराव टाकण्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू करणे शक्य नाही. तर हे काम पूर्ण होण्यासाठी 6-7 तासांचा अवधी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : अस्वलांच्या भयानक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT