Washim zilla parishad schol News sakal
अकोला

Washim News : शिक्षकच नाहीत तर शिकायचे कसे? पालकांसह युवासेनेने लावले जिल्हा परिषद शाळेला कुलूप

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग ५ ते वर्ग १२ पर्यंत तब्बल २५ शिक्षकांच्या जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा

मंगरूळपीर : विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. शासनाने शिक्षक उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी पालक व युवासेनेने शाळेलाच कुलुप ठोकले. यासंदर्भात तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग ५ ते वर्ग १२ पर्यंत तब्बल २५ शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. मात्र या आंदोलनाचा धसका घेऊन ४ शिक्षक प्रशासनाने उपलब्ध करून दिले.

शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरिब कुटुंबातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.

मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे विदर्भातील एकमेव असे विद्यालय आहे की जेथे १४०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शासनाच्या आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शिक्षक नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे नाव जिल्हा परिषद विद्यालयातून काढून दुसरीकडे टाकले.

वर्ग पाच ते वर्ग बारा पर्यंत ४४ शिक्षकांची नियुक्ती असताना केवळ १९ शिक्षक आज उपलब्ध होते, यापैकी ४ शिक्षक देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नववी आणि दहावी या वर्गाला विज्ञान, गणित, इंग्लिश या विषयाला एकही शिक्षक नाही.

एकीकडे पटसंख्येेअभावी शासनाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळा बंद पडू नयेत म्हणून शासन अनेक उपाययोजना राबवते. मात्र दुसरीकडे विद्यार्थी असूनही शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, याकडे शासन, प्रशासन लक्ष देणार की नाही? असा प्रश्न निर्माण होतो.

मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये रिक्त असलेल्या सर्व शिक्षकांची नियुक्ती करावी किंवा प्रतिनियुक्तीवर इतर आस्थापनातील शिक्षक नेमून द्यावे, जेणेकरून शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. अशी मागणी युवासेनेने केली.

यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख विवेक नाकाडे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले, शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर युवतीसेना जिल्हा प्रमुख प्रिया महाजन, युवासेना विधानसभा प्रमुख अर्जुन सुर्वे,

जिल्हा सचिव गजानन ठेंगाडे, राजा भैया पवार अकील तेली, शुभम राठोड कॉलेज कक्ष, सुनील कुर्वे, विश्वास गोदमाले, सोनु जैस्वाल, रवी गोतरकर, संदीपान भगत, सुमेर शेख, अजय भालेराव, सचिन राऊत, विठ्ठल महाले, प्रवीण घोडचर,आकाश कांबडे, सुनील भोंडणे, अजय सुरोसे, लखन गवळी, सचिन राऊत, मंगेश सावडे उपस्थिती होते.

जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये सध्या स्थितीत २५ पदे रिक्त आहेत तर ४ शिक्षक प्रतीनियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या २१ पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात प्रशासनाला वारंवार पत्र दिले आहे.

- एस पी टिक्कस, प्राचार्य, जि. प. माध्यमिक विद्यालय, मंगरुळपीर

वाशीम जिल्ह्यात क्रमांक एकवर असलेली मंगरूळपीरच्या जिल्हापरिषद हायस्कूलची शिक्षक नसल्याने दयनीय अवस्था झालेली आहे. यामुळे गोरगरिबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर शिक्षक देऊन विद्यार्थ्याचे भविष्य सुखकर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू.

- दशरथ पवार, पालक

आम्हाला शिकवायला शिक्षक नाहीत यामुळे आमच्या स्वप्नांचा बट्ट्याबोळ होतो की काय? असा प्रश्न आमच्या समोर आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला एकवेळ फुकटची खिचडी दिली नाही तरी चालेल, मात्र आम्हाला शिकवायला शिक्षक द्या.

- समृद्धी दीक्षित, विद्यार्थिनी, वर्ग १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT