राष्ट्रवादी Sakal
अकोला

मानोरा : राष्ट्रवादीच्या मांडवात आगंतुकांचा गरबा

बॅनर व कार्यक्रमातून जिल्हाध्यक्ष वजा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट

संजय अलदर

मानोरा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधे काॅंग्रेसला धोबीपछाड देत पहिल्या क्रमांकावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधे सध्या सवतासुभ्याचा खेळ चांगलाच रंगला आहे. पक्षात नव्यानेच आलेले आगंतुक जुन्यांच्या साथीने पक्षनेतृत्वाला आव्हान देत असल्याचे चित्र समोर येत आहे.

जिल्ह्यामधे राष्ट्रवादी काँग्रेसची जडणघडण माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या मेहनतीतून झाली आहे. पक्षाला वाडीवस्त्यावर पोहचवून प्रतिस्पर्धी काॅंग्रेसला मागे ढकलत स्थानिक स्वराज्य संस्थेत पहिल्या क्रमांकावर येण्याची किमया ठाकरे यांनी करून दाखविली. सध्या माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांचे चिरंजीव चंद्रकांत ठाकरे जिल्हाध्यक्ष आहेत.

तसेच ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही आहेत. मागील महिन्यात मानोरा नगर पंचायतची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात हाजी यूसुफ पुंजानी व हेमेंद्र ठाकरे यांनी पक्ष प्रवेश केला. निवडणूकीत सर्वांनी एक दिलाने काम केले मात्र निवडणूक संपताच बेकीची लागण होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

पक्षात नवीन आलेल्या गटाने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराना सहकार्य केले नाही, असा आरोप करुन नंतरच्या काळात चंद्रकांत ठाकरे यांना वगळून हाजी यूसुफ पुंजानी, दत्तराज डहाके व हेमेंद्र ठाकरे, अशोक परळीकर यांनी पक्षातच वेगळी वाट धरल्याची चर्चा आहे.

नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले. याकरिता सर्वांचे प्रयत्न कामी आले. जिल्हाध्यक्ष यांनी प्रत्येक वार्डात प्रचार केला होता. मात्र काही बॅनर पोस्टर वरुन ज्यांनी वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया भरला, मोठ्या प्रमाणात पक्षाची बांधणी केली, असे माजी मंत्री सुभाष ठाकरे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे फ़ोटोच वगळण्यात आल्याची चर्चा असल्याने पक्षात आलबेल नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना अर्धचंद्र दिला. नवनिर्वाचित नगरसेवक यांचा कारंजा, मानोरा येथे सत्कार घेतला, कारंजा येथे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. त्यात चंद्रकांत ठाकरे दिसले नाही. याचा अर्थ म्हणजे पक्षात गटबाजी फोफवली आहे. परंतु प्रोटोकॉलनुसार पक्षाचे जिल्हा अध्यक्षच नाही, तो कार्यक्रम कोणाचा? तो राष्ट्रवादी काँग्रेसचा का फुटीर गटाचा? सर्वच कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष यांना बोलावणे अपेक्षित असताना त्यांना डावलून कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. अनेक पक्ष बदलून आलेले नेते तीन महिन्यात आपल्या स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत अशा प्रतिक्रिया पक्षातच उमटत आहेत.

सोशल मीडियावर बेकीचे बिज

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काहींचे प्रवेश झाले. नगर पंचायतमध्ये सोबत प्रचार केला, परंतु काही दिवसातच सोशल मीडियावर वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. एवढे असताना सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, हे विशेष. पक्षात राहून पक्षातील नेत्यांना डावलण्याचे षडयंत्र कोण करीत आहे? अशी चर्चा मात्र जोर धरत आहे.

पक्ष प्रवेशात जिल्हाध्यक्ष अनभिज्ञ

कारंजा मानोरा मतदार संघात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश होताना दिसत आहे, परंतु प्रवेश करताना जिल्हा अध्यक्ष असणे गरजेचे आहे परंतु यापासून जिल्हाध्यक्ष अनभिज्ञ आहेत की कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांना बोलविलेच नाही? याची उत्सुकता जिल्ह्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT