manora Gram panchayat water filter machine unused water crisis akola Sakal
अकोला

Akola News : ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत

सदोष कामामुळे लाखो रुपये पाण्यात : नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

संजय अलदर

मानोरा : तालुक्यातील ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर बंद असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पदरात मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत. या पाणी फिल्टरवर लाखो रूपये खर्च केले गेले, मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीला दोन वर्षापूर्वीच वॉटर फिल्टर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील काही मशीन ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या, तर काही इतर ठिकाणी लावण्यात आल्या. ग्रामपंचायतकडून पाच ते दहा रुपयांत १५ लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, ही सुविधा आता निकामी ठरली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेल्या मशीनला पाणी उपलब्ध आहे , काही ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्याने, तर काही ग्रामपंचायतला निधी उपलब्ध नसल्याने अनेक कारणास्तव ह्या मशीन बंद अवस्थेत केवळ ग्रामपंचायत कार्यालयाची शोभा वाढवत आहेत. अनेक गावात लावण्यात आलेल्या मशीनचे काम योग्यरित्या करण्यात आले नाही. बसविताना सदोष काम करण्यात आले.

यामुळे काही दिवसांतच ही मशीन जमीनदोस्त झाली. तेव्हापासून या मशीनकडे दुर्लक्ष करण्यात आले. ह्या मशीन उपयोगात नसल्यामुळे या गावातील नागरिकांना आता खाजगी ठिकाणी २० लिटर पाणी २५ रुपयांत विकत घ्यावे लागत आहे. गावातील काही जलस्रोताचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळेच वॉटर फिल्टरची सोय करून देण्यात आली होती.

परंतु ग्रामपंचायतीला ही टिकवता आली नाही. मशीन दुरुस्ती किंवा इतर उपाययोजना करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. नागरिकांच्या आरोग्याचा, आर्थिक प्रश्न असताना ग्रामपंचायतीला काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसते. दुरुस्ती केल्यास या मशीन उपयोगात आणता येऊ शकतात. वास्तविक फिल्टर मशीनचे काम सुरू असताना ग्रामसचिवांनी लक्ष घालणे अपेक्षित होते, परंतु, त्यांनी याची तसदी घेतल नाही. आताही याविषयी गांभीर्य दाखविले जात नाही, या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

या ग्रामपंचायतमधील फिल्टर मशीन बंद अवस्थेत

ग्रामपंचायत म्हसनी, विठोली, कुपटा,पालोडी, इंझोरी, रुद्राळा, वाईगौळ, शेंदोना, कारखेडा या ग्रामपंचायतमधील फिल्टर मशीन बंद अवस्थेत आहेत.

काही ग्रामपंचायतमधील फिल्टर मशीन बंद असतील तर दोन दिवसात ग्रामसेवकांची तातडीने बैठक बोलावून त्यांच्या त्या संदर्भातील समस्या जाणून त्यावर लवकरच त्यांना दुरुस्तीचे आदेश देण्यात येतील व या फिल्टर मशीन दुरुस्त झाल्यावर नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

-गजानन पिल्लेवाड गटविकास अधिकारी प॔. स. मानोरा

पाणी नसल्याने गावातील फिल्टर मशीन बंद आहे. गावात नळ योजना आहे. त्या नळ योजनेचे पाणी १५ दिवसातून एकदा येते. त्यामुळे फिल्टर मशीन बंद आहे. लवकरच एम जी पी मार्फत नवीन योजना सुरू होणार आहे. तेव्हा मात्र ही फिटर मशीन सुरळीत सुरू राहील.

-पंकज जयदीप वाळके, सरपंच कुपटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT