Many in Akola have been deceived in the name of giving flats in Pune  
अकोला

पुण्यात फ्लॅट देण्याच्या नावाने अकोल्यातील अनेकांना गंडविले ; रामदासपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : व्यापारी व उद्योजकांना पुण्यात फ्लॅट विकत घेवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
अकोल्यातील रहिवासी देवेंद्र गोपाल अग्रवाल याने पुण्यातील स्पार्क रियालिटी या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात असलेल्या सुमित नामक व्यक्तीच्या मदतीने अकोल्यातील अनेकांना पुणे येथे फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. दर महिन्याला एक किस्त भरून तीन वर्षांत फ्लॅट ताब्यात देण्याचे आमिष या दोघांनी दाखविले होते. त्यांच्या आमिषाला शहरातील डॉक्टर, वकील, अभियंते यांच्यासह अनेक उच्च शिक्षित प्रतिष्ठित नागरिकही पडले. ज्या व्यक्तींनी तीन वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना फ्लॅटची गरज नसेल तर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्यात येईल, अशी हमी या दोघांनी अकोलेकरांना दिली होती. त्यामुळे या आमिषाला अनेक जण बळी पडले. 

काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काहींनी रामदासपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झालेल्या डॉक्टर वाघेला पिता-पुत्रांनी तक्रार दाखल केली आहे. तब्बल दहा ते बारा जण तक्रार करण्याच्या मनस्थितीत आहेत. पुण्यातील फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविणाऱ्या या दोघांनी खडकी परिसरातही अनेकांना अशाच प्रकारे गंडविल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस आरोपींच्या शोधात असून, अधिक तपास रामदासपेठ पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकपिटमध्ये चाकू हल्ला, विमान वेगाने खाली आलं... तरी १७४ जणांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार कोण? साहस पाहून नेतान्याहू, ट्रम्पही शॉक

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

SCROLL FOR NEXT