maratha kunbi records survey through app municipal training to officials akola esakal
अकोला

Maratha Reservation: अकोला शहरातील मराठा बांधवांच्या सर्वेक्षणाची मनपाकडून तयारी

ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण; आठ दिवसांत तयार होणार अहवाल

सकाळ वृत्तसेवा

Akola News : राज्य शासनाने मराठा-कुणबी नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रातही या नोंदी शोधण्यात येत असून, शहरातील मराठा समाज बांधवांच्या सर्वेक्षणाची तयारी करण्यात आली आहे. ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची गेले मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.

या बैठकीला अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदीसुद्धा उपस्थित होत्या. शहरातील मराठा समाज बांधवांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.

अकोला शहरात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲप विकसीत करण्यात आले असून, महानगरपालिकेच्या ३०० कर्मचाऱ्यांची या सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आठ दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करून राज्य मागासवर्गीय आयोगाला पाठविण्यात येणार आहे.

मनपाच्या ३०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे येथे गोखले व रानडे इन्स्टिट्यूट यांनी एक ॲप तयार केले असून, या ॲपमध्ये मराठा समाज बांधवांची माहिती भरण्यात येणार आहे. त्यापूर्वी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, नंतर युझर व आयडी देण्यात येतील. त्यासाठी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी ३०० कर्मचाऱ्यांची या सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली आहे.

दीड लाख घरांपर्यंत पोहोचणार

मराठा समाजाच्या नोंदी घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या मूळ हद्दीसह वाढीव क्षेत्रातील दीड लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे आव्हाण मनपा कर्मचाऱ्यांपुढे राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT