maratha reservation case survey work for reservation and proof of cast esakal
अकोला

Maratha Reservation : मराठा समाज सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात; तीन लाखांवर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत तीन लाख ९५ पैकी तीन लाख १० हजार ५८० कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत तीन लाख ९५ पैकी तीन लाख १० हजार ५८० कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. ७८. ६० टक्के काम झाले असून, आणखी २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी प्रशासनाला मुदत वाढवून मिळाली आहे.

मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. याच अनुषंगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्य मागासवर्ग आयाेगाकडे साेपविण्यात आले.

माेबाईल फाेनमधील ॲपद्वारे सर्वेक्षण कसे करायचे, यासाठी संबंधित प्रगणकांसाठी प्रशिक्षणाचेही आयाेजन करण्यात आले. ता. २३ जानेवारी राेजी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सर्वेक्षण करताना प्रथम नाव व नंतर जात नमूद करावी लागत असून, या जातीला आरक्षण लागू असल्याने तेथेच सर्वेक्षण संपते.

मात्र मराठा किंवा खुल्या प्रवर्गाचा व्यक्ति असल्यास संपूर्ण सर्वेक्षण करावे लागते. १८२ प्रश्नांची उत्तरे, माहिती भरावी लागते. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी तुलनेने वेळ लगताे.

तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण लांबले

पहिल्या दिवसापासूनच सर्वेक्षण प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. अनेकांच्या माेबाईलमध्ये ॲप इन्स्टाॅल झाले नाहीत. सर्वेक्षणासाठीचा सर्व्हर डाऊन हाेता. अशा वेळी काही वेळ थांबावे लागते. तसेच सर्वेक्षणासाठी ओटीपी (वन टाईप पासवर्ड) प्राप्त हाेण्यासाठी वेळ लागला हाेता.

दुसऱ्या दिवशी मात्र अडचणी दूरझाल्या. काही ठिकाणी महिला काैटुंबिक माहितीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. नागरिकांनी सर्वेक्षणापूर्वीच कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. कर्मचाऱ्यांना आधी आम्ही कशासाठी आलाे, हे सांगावे लागले. साेमवारी तर जुने शहरातील काही भागात विराेध झाल्याने सर्वेक्षणच करण्यात आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT