minor girl assault in hostel two student and salesman arrested akola police Sakal
अकोला

Akola Crime : वसतिगृहात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे दोघे अभियांत्रिकीचे विद्यार्थी अन् एक सेल्समन, काय घडलं नेमकं ?

अकोला शहरातील मोठी उमरी भागातील रहिवासी असलेल्या एका महिलने तिच्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : शहरातील एका प्रख्यात शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात एका १४ वर्षीय मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी सिव्हील लाइन्स पोलिसांनी अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांसह एका सेल्समनला अटक केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मोठी उमरी भागातील रहिवासी असलेल्या एका महिलने तिच्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्याच दिवशी ही मुलगी घरी परतली. तिने तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे सांगितल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

तत्काळ आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात प्राप्त माहितीनुसार पीडित मुलीला अनुराग मनोहर चौधरी (२०, रा. यावल, जि. जळगाव) याने दुचाकीवर बसवून शहरातील रामदास पेठ हद्दीमधील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेले.

तेथे आरोपी अनुराग, त्याचा मित्र दीपक विठ्ठल मडावी (२५, रा. सिंधी कॅम्प, अकोला), तसेच अंकुश विलास वक्टे (२५, रा. कौलखेड, अकोला) यांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींपैकी अनुराग व दीपक हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून अंकुश सेल्समनचे काम करतो.

महिला अधिकाऱ्यांनी नोंदवले बयाण

याप्रकरणात सदर मुलीचे बयान सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले. त्याने तिने घटनाक्रम सांगितला. त्यातून प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी कलम ३७६, ३७६ दोन एल, ३७६ तीन, ३७६ आय, ३७६ डी.ए., ३,४,६,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT