shop.jpg 
अकोला

अनलॉक-१ चे नियमही तुडवले पायाखाली... वाचा कसे

सुगत खाडे

अकोला : कोरोना संसर्गाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला टप्प्या-टप्प्याने उठवण्याचे जाहीर करत शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केले आहे. त्याअंतर्गत नियम व अटींच्या अधीन राहून व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु मिशन बिगीन अगेनला शुक्रवारी (ता. 5) नागरिकांसह व्यापाऱ्यांनी ठेंगा दाखवल्याचे दिसून आले. गत 70 दिवसांपासून घरात कोंडलेले नागरिक खरेदीसाठी व कामानिमित्त घराबाहेर पडले. व्यापाऱ्यांनी सुद्धा सम-विषय नियमाला धाब्यावर बसवले. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्ग कमी होण्यायेवजी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात 24 मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 30 जूनपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्‍यात आला आहे. सदर लॉकडाउन प्रतिबंधीत क्षेत्रासाठीच लागू राहिल. असे असले तरी अर्थचक्राला गती देण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु करून गत 70 दिवसांपासून घरांमध्ये कोंडलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांना नियम व अटींच्या अधीन राहून घराबाहेर पडण्यास सुट व व्यापार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यानंतर सुद्धा शुक्रवारी (ता. 5) बाजारात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. बाजारातील दुकाने सम-तारखेस सुरु करण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना दिल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दोन्ही बाजूची दुकाने सुरु केली. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास नागरिक व व्यापारी निरुत्साही असल्याचे दिसून आले. नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या अशा बेजबाबदारपणामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचा संसर्गा वाढण्याची दाट शक्यता आहे. 

चौका-चौकातून पोलिस गायब
लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध घालण्यासाठी चौका-चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु झाल्यानंतरच चौका-चौकातून पोलिस कर्मचारी गायब झाल्याचे दिसून आले. रस्त्यांवर हटकणारा व प्रतिबंध घालणारा व्यक्तीच उपलब्ध नसल्याने रस्त्यांवर नागरिकांचा मुक्त संचार दिसून आला. 

पार्किंगची अव्यवस्था
दुकाने व आस्थापना सुरु झाल्यानंतर ग्राहकांच्‍या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. परंतु सदर आदेशाची अंमलबजावणी कोणत्याच दुकानाबाहेर अथवा बाजारात होताना दिसून आली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT