Molestation of minor girl crime against two by court order akola
Molestation of minor girl crime against two by court order akola Sakal
अकोला

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, न्यायालयाचे आदेशाने दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एका १४ वर्षाच्या मुलीच्या घरात घुसून विनयभंग केल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस तक्रारीनुसार ता. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी आजोबा आपल्या नातीसह घरी होते. यावेळी सरकारी कर्मचारी असलेले विनायक रामदास तायडे व विक्रम रतनबाबू बन्ने हे दोघे घरात आले. त्यांचे सोबत दोघे बाहेर थांबले. घरात आलेल्यांनी तुमचा मुलगा कोठे आहे त्याची रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार आहे. त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जायचे आहे, असे सांगितले. त्याचवेळी १४ वर्षीय नात ही आजोबाजवळ आल्यानंतर यातील एकाने मुलीचा विनयभंग केला व तुझे वडिल कोठे आहेत, असे म्हणून शिवीगाळ केली.

या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. अखेर तक्रारदारांनी ॲड. सी.ए. दंदी यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विनायक रामदास तायडे व विक्रम रतनबाबू बन्ने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT