Mother Assaulted By Son In Akola Esakal
अकोला

Mother Assaulted By Son: महाराष्ट्र हादरला! 31 वर्षीय मुलाने जन्मदात्रीवरच केला अत्याचार

Akola Crime News: रविवारी रात्री त्याने घरात मद्याच्या नशेत असताना आपलीच ५९ वर्षीय माता हिला बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

अकोला: शहरातील एका भागात रविवारी ३१ वर्षीय मद्यपी मुलाने आपल्या ५९ वर्षीय मातेवर अत्याचार केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले.

या विकृत मुलास पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे. जुने शहरात एका मुलाने मद्याच्या नशेत आपल्या राहत्या घरातच आपल्या जन्मदात्रीवर बळजबरीने अत्याचार केला. या विकृत कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नेहमीच मद्याच्या आहारी गेलेला असायचा आणि यापूर्वीही आपल्याबत वाद घालत असे. कधी मधी तो सेंट्रींग चे काम करायचा बहुता बेरोजगार असल्याने त्याला हे मद्याचे व्यसन जडले होते.

रविवारी रात्री त्याने घरात मद्याच्या नशेत असताना आपलीच ५९ वर्षीय माता हिला बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार केला असला तरी आरोपीने तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला.

या कृत्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेवसकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महिलांविरोधात गुन्हे वाढले

दरम्यान गेल्या काही काळात राज्यात महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालात शहरांमधील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती.

दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी समर्पित हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत आणि नागरिकांना घटनांची पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! झुंड चित्रपटात भूमिका केलेल्या कलाकाराचा खून; पोलिस म्हणाले...

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमानतळामुळे प्रवास सुखकर होणार- अजित पवार

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Nashik News : नवीन नाशिकमध्ये 'एआय'चा धुमाकूळ! बिबट्याचे बनावट फोटो व्हायरल, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

PM Jeevan Suraksha : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा एक रुपयाचा फायदा नाही अन् सर्व सामान्यांकडून २५ कोटीहून अधिक रक्कम वसूल

SCROLL FOR NEXT