mpsc five students become ministry clerk at time akot education sakal
अकोला

Akot News : अकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा; पाच विद्यार्थी एकाच वेळी मंत्रालय लिपिक!

स्पर्धा परीक्षेतून मिळविले यश; महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२१ मध्ये गट ‘क’ साठी परीक्षा घेण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

अकोट : जिल्ह्यात स्पर्धा परीक्षाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जात असलेल्या अकोटात पहिल्यांदाच पाच विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक पदासाठी निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड होणाऱ्यांमध्ये दोन मुली, तीन मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे पाचही विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२१ मध्ये गट ‘क’ साठी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल ता.१२ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात अकोट शहरातील नितेश आम्ले, अंकिता राख, वैष्णवी कपले,

रोहित बानेरकर, मयूर लोणकर हे एकाच अभ्यासिकेत शिकणारे विद्यार्थी मंत्रालय लिपिक पदासाठी पात्र ठरले आहे. विशेष म्हणजे, यापैकी मयूर लोणकर या पठ्ठ्याची लिपिक पदाबरोबरच कर सहाय्यक पदाकरिता देखील निवड झाली आहे.

सर्व परीक्षार्थीनी मेहनत, जिद्द चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवून प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर सोबत खडतर परिश्रमातून खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत हे यश मिळविले आहे.

यापूर्वी सुद्धा अकोट तालुक्यातून बावीस विद्यार्थ्यांची फेब्रुवारी २०२० मध्ये एकाच वेळी भारतीय सैन्य दलात, तदनंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पंधराहून अधिक विद्यार्थ्यांची निवड निमलष्करी दलात झाली होती. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अकोट तालुक्यात सर्वाधिक असल्याचे एकंदरीत निकालावरून स्पष्ट होते.

अभ्यासिकेत तासनतास अभ्यास करून सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. या निकालाने अकोट शहराची मान उंचावली असून, स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आता अकोट तालुक्यातून असल्याचा आम्हाला गर्व आहे.

- प्रा. कैलास वर्मा, टार्गेट अकॅडमी, अकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT