Hirkani Bus News sakal
अकोला

MSRTC Hirkani Bus : प्रवास होणार आणखी आरामदायी एसटीला मिळणार २०० नवीन ‘हिरकणी’

वाढीव प्रवासी संख्येमुळे उत्पन्नात वाढ; राज्यातील बस टाकणार कात

सकाळ डिजिटल टीम

Akola News : महिलांसाठी ५० टक्के बस प्रवासातील सवलत, ही योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी जीवदान ठरले आहे. मात्र, वाढीव प्रवाशी संख्येचा सामना करण्याची क्षमता एसटीमध्ये नाही.

त्यावर तोडगा म्हणून एसटीला नवीन २०० हिरकणी बस उपलब्ध करून दिल्या जात आहे. या बसची निर्मिती मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सुरू आहे. बीएस सहा नवीन हिरकणी बस आता नवीन रंगामध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यापूर्वी गुलाबी रंगसंगती असलेल्या हिरकणीला आता जांभळा रंग देण्यात येत आहे.

अतिशय सुंदर अशी बांधणी असलेली ही नवीन हिरकणी लवकरच लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी या ठिकाणी १२० हिरकणी बसेस बांधण्यात येणारआहे.

त्यापैकी ५० पेक्षा जास्त गाड्या बांधून झाल्या आहेत. त्यासोबतच मध्यवर्ती कार्यशाळा चिखलठाणा, संभाजीनगर या ठिकाणी ५० हिरकणी बसेस बांधणी होणार आहे. मध्यवर्ती कार्यशाळा हिंगना, नागपूर या कार्यशाळेत ३० बसेस बांधण्यात येणार आहे.

अतिशय सुंदर अशा २०० बसेस महाराष्ट्रात वेग वेगळ्या मार्गांवर लवकरच धावताना दिसणार आहे. त्यामुळे एसटीच्या जुना बसमधून प्रवास करताना होणाऱ्या त्रासातून काही प्रमाणात तरी प्रवाशांची सुटका होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT