msrtc buses busy in lok sabha election alternative travel arrangements Sakal
अकोला

Akola Lok Sabha Poll : प्रवासाला निघताय, पर्यायी व्यवस्था करा; बसगाड्या निवडणुकीत व्यस्त

अकोला लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासाठी २०० हून अधिक बसेस दोन दिवस व्यस्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासाठी २०० हून अधिक बसेस दोन दिवस व्यस्त आहेत. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.

लोकसभा निवडणूक व्यवस्थेंतर्गत मतदान केंद्रांवर कर्मचारी, मतदान यंत्र पोहोचवण्यासाठी २५ आणि २६ एप्रिल अशा दोन दिवसांसाठी २०० पेक्षा अधिक गाड्या भाडेतत्त्वावर मागविण्यात आल्या आहेत. अकोला परिवहन विभागाकडे गाड्यांचा प्रचंड तुटवडा आहे.

त्यात निवडणूक विभागाची गरज भागवण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूरकडून गाड्या मागवल्या आहेत. त्यामुळे दोन दिवस प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित होणार आहे. दोन दिवसांसाठी जिल्हा निवडणूक अधिका-यांनी अकोलाच्या दोन विभागाकडे गाड्यांची मागणी केली आहे. मुख्य म्हणजे यवतमाळ मतदार संघात येणा-या वाशीम जिल्ह्यासाठी अकोला विभागातूनच गाड्या जाणार आहेत.

वाशीम ११०, तर अकोल्यात १८३ गाड्या व्यवस्थेमध्ये असणार आहेत. पूर्वी ही मागणी २१० गाड्यांची होती. यामध्ये कमी करण्यात आली. मागणी पूर्ण करण्यासाठी नागपूर मंडळातून ७० गाड्या मागवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर वेळेत कर्मचारी, मतदानाच्या पेट्या,

व्हीव्हीपॅट मशीन तसेच पोलिसांना त्या प्रत्येक केंद्रावर पोहोचवणे तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षितपणे घेऊन जाणे या सर्व प्रक्रियेसाठी एसटी विभागाकडे गाड्यांची मागणी केली आहे. अकोला परिवहन विभागातील ९ आगारांतून या गाड्या गरजेनुसार सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन दिवस प्रवाशी वाहतूक विस्कळीत होणार आहे.

बसेसचा तुटवडा

अकोला विभागाकडे ९ आगार मिळून ३२० बसेस आहेत. यापैकी ३०५ गाड्या नियमित मार्गावर, तर १५ ते २० गाड्या वर्कशॉपला दुरुस्तीला असतात. प्रत्यक्ष उपलब्ध होणा-या ३०५ गाड्यांपैकी २८ शिवशाही व २ हिरकणी गाड्या आहेत. जिल्ह्यात वाहतुकीसाठी गाड्या नसल्याने नागपूर विभागातून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. या गाड्या तालुकास्तरावर सेवा देणार आहे. दिवसभरात फक्त एक फेरी अमरावतीला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती एस.टी.महामंडळाकडून प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT