अकोला

उष्टा ग्लास माठात बुडवल्याने सावत्र बापाने केली चिमुकल्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : उष्टा ग्लास पिण्याच्या पाण्याच्या माठात बुडविल्याने जमिनीवर आपटून आठ वर्षीय बालकाची हत्या करण्यात आली. ही घटना तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर येथे शनिवारी घडली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली राजू कुमरे (२९, रा. पोहा, ता. कारंजा, जि. वाशीम) ही पतीपासून विभक्त राहत होती. ती अकोला येथील एमआयडीसी येथे काम करीत होती. तिथे संजय शामराव नवलकार (३०, रा. वाडी, अदमपूर, ता. तेल्हारा) याच्यासोबत तिची ओळख झाली. संजय नवलकार हा विवाहित होता. त्याला दोन मुली होत्या. त्याची पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे त्याचे सूत सोनाली कुमरे सोबत जुडले.

त्याने सोनालीला ‘मी तुला व मुलांना आधार देईल’ असे आश्वासन दिले. त्यामुळे सोनाली कुमरे मुलगी श्रावणी वय १० व मुलगा वेदांत वय ८ वर्ष या दोन्ही मुलांसह संजयच्या घरी (रा. वाडी अडमपूर) राहू लागली. ७ ऑगस्टला सोनाली कुमरे ही शेतात गेली असताना घरी मुले व संजयच होता. तहान लागली म्हणून वेदांतने पाणी पिण्यासाठी ग्लास घेतला आणि पाणी पिले. परत पाणी घेण्यासाठी उष्टा ग्लास माठात बुडविला. उष्टा ग्लास पाण्यात बुडविल्याने संजयने काठी फुंकणीच्या साहाय्याने मारहाण करून जमिनीवर आपटले. बाथरूममध्ये नेऊन छातीवर दगड ठेवला. त्याला वाचविण्यासाठी दहा वर्षीय बहीण गेली असता तिला देखील मारहाण केली.

सोनाली कुमरे ही शेतातून परत आल्यावर जखमी वेदांतला उपचारासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अकोला येथील सरोपचार रुग्णालयात रेफर केले; मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. सोनाली कुमरे हिने दिलेल्या तक्रारीवरून व शवविच्छेदन अहवालावरून संजय नवलकार यास पोलिसांनी अटक केली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT