आता ग्रामीण भागातही ‘हिरोपंती’ करणे भोवणार! sakal
अकोला

Akola: आता ग्रामीण भागातही ‘हिरोपंती’ करणे भोवणार!

मूर्तिजापूर, अकोट, पातूरमध्येही दामिनी पथक कार्यान्वित!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : चिडीमारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात नवीन सुसज्ज असे दामिनी पथक अकोला शहरात सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस स्टेशन मूर्तिजापूर शहर, अकोट शहर व पातुरमध्येही आता दामिनी पथक गठित करुन ते कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे महिला व युवतींची सुरक्षा करण्यास मदत होईल.

शहरासह ग्रामीण भागामध्ये महिला व युवतींसोबत छेडछाडच्या घटना घडतात. परंतु त्या भितीमुळे पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पोलिस प्रशासनाने अकोला महापालिका क्षेत्रात दामिनी पथक कार्यान्वित केले आहे. त्याच धर्तीवर आता ग्रामीण भागात सुद्धा तीन ठिकाणी दामिनी पथक सुरू करण्यात आले आहे. तालुकानिहाय दामिनी पथक पोलिस स्टेशन हद्दीतील विविध निर्जन स्थळी, महाविद्यालये, विद्यालये, शाळा, खासगी शिकवणी वर्ग, महिला आश्रम इत्यादी ठिकाणी प्रभाविपणे गस्त घालणार आहे.

महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन जारी

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांंनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ जारी केला आहे. सदर क्रमांकावर पिडीत महिलांनी किंवा संकटात सापडलेल्या महिलांनी तक्रार केल्यास त्वरीत दामिनी पथक घटनास्थळी जावून मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

SCROLL FOR NEXT