Crime News  esakal
अकोला

Crime News : मूर्तिजापूर पोलीसांनी केले दोन तासात दोन गुन्हेगार जेरबंद

नंगी तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यां पैकी एकाची काढली धिंड

सकाळ डिजिटल टीम

मूर्तिजापूर : शहरातील विविध गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता असणाऱ्या दोन चोरट्यांना येथील शहर पोलीसांनी आज २४ तासांच्या आत आणि माहिती मिळताच दोन तासांच्या आत जेरबंद केले असून या लसण चोरट्या टोळक्यातील तिसरा फरार आहे.

येथील भाजीपाला व्यावासायिक माणिकराव खरबडकर यांनी हर्रास बाजारात ठेवलेल्या लसुणाच्या८ कट्ट्यांपैकी ३५ हजर रुपये किंमतीचे चार कट्टे बेपत्ता असल्याचे त्यांच्यानिदर्शनास आले. त्यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणातील चोरटे येथील कारंजा बायपासवर असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार भाऊराव घुगे यांना मिळाली, त्यांनी लगेच उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी,डी बी पथकाचे हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, मंगेश विल्हेकर, गजानन खेडकर,कॉन्स्टेबल सचीन दुबे सह कारंजा बाय पास गाठला. येथील नविन घरकूल वसाहतीत रहाणारे दानीश उर्फ राजा फिरोज खान व इमरान खान नासीर खान यांना यांना ताब्यात घेतले.

तिसरा चोरीचा माल वाहून नेणाऱ्या वाहाहनासह फरार झाला. दानीश आणि इमरान या दोघांनाही महत्प्रयासाने बोलके केल्यानंतर ते कबूल झाले. यापैकी दानीश वर मोटार सायकल, जनावरे, कोंबड्या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत आज त्या दोघांनाही शहर पोलीस ठाण्याच्या लॉक अप मध्ये ठेवण्यात आले असून त्यांचा उद्या पिसीआर घेण्यात येईल व त्यांना आणखी बोलते केले जाईल, असे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी सांगितले. शहरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचा व घरफोड्यांचा सुगावा या प्रकरणातील आरोपींच्या कस्टडी दारम्यान लागू शकतो, असा आशावाद शहारवासींयांमधून व्यक्त होत आहे. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखात हेड कॉन्स्टेबल मंगेश घाटे करीत आहेत.

दरम्यान गेल्या शुक्रवार बाजारात नंगी तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या तिघांना चाकू आणि चॉपर घेऊन साथ देणाऱ्या रुषी किर्दक नावाच्या आरोपीची ठाणेदार भाऊराव घुगे यांनी आज शहराच्या मुख्य रस्त्यावरून धिंड काढली असून त्याच्या तिघा फरार सहकाऱ्यांचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mankhurd Accident: सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा भीषण अपघात; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू,५ जण जखमी

Koyna Dam Water Level Today : कोयना धरण 60 टक्क्यांच्या उंबरठ्यावर; महाबळेश्वर खोऱ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 2.35 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Latest Marathi Update : आंदोलकांना रोखण्यासाठी नाकेबंदी, पोलिसांनी बॅरिकेड्सना केलं वेल्डिंग

Fifa World Cup Final : स्पेनने १६ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला, पण त्यांना खरी ट्रॉफी मिळालीच नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ट्रॉफी नकली होती? नेमकं काय घडलं?

Jamkhed Accident: भाजप आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्याच्या वाहनाला अपघात; अंगरक्षकासह तिघे गंभीर जखमी, चालकाचा ताबा सुटला अन्..

SCROLL FOR NEXT