अकोला

Ayodhya Ram Mandir : राममंदिरासाठी २३ वर्षे पायात नाही चप्‍पल; वडिलांच्‍या पुण्याईचे फळ मुलाला, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शीलापूजन, कारसेवा आदि प्रत्येक लढ्यात, उपक्रमात हिरिरीने त्यांचा सहभाग होता.

विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा : अयोध्येत रामजन्मभुमीवर प्रभु रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून कैलासवासी झालेले नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी येथील नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा त्यांनी मरेपर्यंत (२००८ ‌‌) म्हणजे २३ वर्षे पाळली.

ते आज हयात नसताना आता २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन होत असून, राम मंदिर निर्माणाधीन कार्याचे साक्षीदार जरी ते बनणार नसले तरी त्यांचे चिरंजीव उद्धव महाराज जुनारे जे,आज मुक्ताई संस्थानमध्ये कार्यरत असून, संस्थानला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण असल्याने त्यांची निवड यासाठी करण्यात आली असून, ते या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनणार आहेत.

कै. नारायण महाराज जुनारे यांचे मुळगाव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी हे होय. मुक्ताईनगर येथील संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रत जोपासून विणेकरी असलेले व शेवटपर्यंत मुक्ताईच्या चरणी आध्यत्मिक कार्याला वाहून देणारे कैलासवासी नारायण महाराज जुनारे हे अयोध्या आंदोलनात १९८६ पासून सहभागी झाले होते.

तेव्हापासून त्यांनी जवळपास २३ वर्ष म्हणजे २००८ पर्यंत मरेपर्यंत पादत्राणे घातली नाहीत. तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शीलापूजन, कारसेवा आदि प्रत्येक लढ्यात, उपक्रमात हिरिरीने त्यांचा सहभाग होता.

विश्र्व हिंदु परिषद मोताळा प्रखंड प्रमुख, खामगाव जिल्हा संतसमिती प्रमुख, विहिंप विदर्भ प्रांत‌ आजीवन सदस्य जबाबदारी सांभाळून विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतात राम मंदिर लढ्यातील एक निस्पृह तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख झाली होती.

श्रीरामपंत जोशी, राजेशजी जोशी, बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृहकार्याचा गौरव अनेक वेळा करायचे. सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत कारसेवेत ते अग्रेसर राहिले.

तांदुळवाडी येथील अभिमन्यू वामन जुनारे, किसन शामराव जुनारे, गोपाळ निवृत्ती जुनारे, दिलीप पुंडलिक जुनारे, भानुदास नारायण जुनारे व येरळी येथील सुनील हागे हे कारसेवेत अग्रक्रमाने समोर होते.

कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशा लावल्या त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांचेकडे तीन महिने राहिले.आयुष्यभर आपल्या कीर्तन प्रवचनात राम मंदिर आंदोलन जनजागृती हा विषय त्यांचा असायचा.

मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी होते. त्यांचा मी मुलगा असल्यामुळे वेळोवेळी अयोध्येला जाण्याचा योग मला आला. योगायोगाने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्री संत मुक्ताई संस्थानला मिळाले आहे. त्या सोहळ्यासाठी संस्थान प्रतिनिधी म्हणून मी जाणार आहे. हे केवळ बाबांच्या पुण्याईचे हे फळ आहे.

- उद्धव महाराज जुनारे, व्यवस्थापक, श्रीसंत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT