National Achievement Survey Sindhudurg Kolhapur Solapur top in state sakal
अकोला

राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्व्हे; सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर राज्यात अव्वल

शैक्षणिक टक्केवारीत विदर्भ माघारलेलाच

प्रभाकर कोळसे

नंदोरी : देशभरात घेण्यात आलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षणाद्वारे संपूर्ण भारतातील ७२० जिल्ह्यांमधील १ लाख ८ हजार शाळांमधील ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर जिल्हे अव्वल आहे, तर टक्केवारीच्या तुलनेत विदर्भ शैक्षणिक माघारलेलाच असल्याचे दिसते. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी हे सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वी २०१७ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

२०२१ मध्ये राज्यातील ७ हजार २२६ शाळांत २ लाख १६ हजार ११७ विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ३, ५, ८ व १०व्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यात तिसऱ्या वर्गात सिंधुदुर्ग जिल्हा (७३.२ टक्के) अव्वल राहिला. त्याची राष्ट्रीय टक्केवारी ५९ टक्के आहे. पाचव्या वर्गात सोलापूर जिल्हा (६०.७ टक्के), आठव्या वर्गात कोल्हापूर जिल्हा (५०.८ टक्के) आणि दहाव्या वर्गात सिंधुदुर्ग जिल्हा (४३.७ टक्के) अव्वल राहिला आहे.

विदर्भातून तिसऱ्या वर्गात गोंदिया, पाचव्या व आठव्या वर्गात वाशीम, तर दहाव्या वर्गात नागपूर हे जिल्हे टक्केवारीनुसार अव्वल आहेत. मात्र, ही टक्केवारी विचारात घेता राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्वेक्षणात विदर्भ शैक्षणिकदृष्ट्या माघारलेला असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्वेक्षणात इयत्ता तिसरीच्या ९९ टक्के, तर पाचवी, आठवी आणि दहावीच्या ९८ टक्के विद्यार्थ्यांना शाळेत जाणे आवडत असल्याचे निदर्शनास आले.

राष्ट्रीय सरासरी टक्केवारी

  • इयत्ता तिसरी ५९ टक्के

  • इयत्ता पाचवी ४९ टक्के

  • इयत्ता आठवी ४१.९ टक्के

  • इयत्ता दहावी ३७.८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT