NCP Ravi Rathi in Congress internal meeting  
अकोला

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत राष्ट्रवादीचा ‘हेर’! 'या' नेत्याच्या उपस्थितीने उंचावल्या अनेकांच्या भुवया

सकाळ वृत्तसेवा

NCP vs Congress: अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. नाराज नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे. अशीच एक बैठक महान येथे आयोजित केली असता या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने हजेरी लावल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून आघाडी आहे. जिल्ह्यात काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून निवडणुका लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेत. अकोला जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले आहे. जिल्ह्यातील कोणता पदाधिकारी कुण्या नेत्याच्या छत्रीखाली आहे याबाबत संभ्रामावस्था आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्र पक्षामध्ये जिल्ह्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवरही पडणार आहे. त्यातच दोन गटात विखुरल्या गेलेल्या राष्ट्रवादीतील अनेक नेते हे काठावर आहेत. ते दुसरा घरोबा शोधण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसमधील अंतर्गत बैठकीला महान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत रवी राठी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिवाची उपस्थिती अनेकांना खटकली-

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीचे निमंत्रण नाराज नेत्यांसोबत पक्षातील काही मोजक्या नेत्यांनाच देण्यात आले होते. ही बैठक काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत असलेल्या नाराजीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आली होती. असे असताना या बैठकीला मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी हजेरी लावली. त्यांची उपस्थिती अनेकांनी खटकली असल्याचे समजते.

राकाँच्या नेत्याला निमंत्रण दिले कुणी?-

काँग्रेसची अंतर्गत बैठक असताना त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने हजेरी लावल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. बैठकीला राकाँच्या या नेत्याला निंत्रण दिले कुणी, असा विचारणाही करण्यात आली. बैठकीचे यजमानपद सुनील धाबेकर यांच्याकडे होते. ते काँग्रेसचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील नेते आहे. त्यामुळे काहींनी थेट धाबेकर यांनाच विचारणा केल्याचे समजते. मात्र, त्यांनीही रवी राठीच्या उपस्थितीबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT