Murder esakal
अकोला

Buldhana Crime : शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

शेतीच्या वाटा-हिश्शावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद गेला विकोपाला.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा - शेतीच्या वाटा-हिश्शावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद विकोपाला गेला अन् सख्ख्या पुतण्याने काकावर ट्रॅक्टर चालवून त्यांचा खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे ६ जूनला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. जनार्धन तुकाराम जोशी असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, धोत्रा भनगोजी येथे जनार्धन तुकाराम जोशी व उत्तम तुकाराम जोशी या दोन सख्ख्या भावांमध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटा-हिश्शावरून पूर्वीपासून वाद आहे. या वादाने अमडापूर पोलिस स्टेशनसह दिवाणी न्यायालयाची पायरी यापूर्वीच ओलांडलेली आहे.

दरम्यान, ६ जून रोजी शेतकरी जनार्धन जोशी यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतात या प्रकरणातील संशयित व मृतकाचा पुतण्या समाधान उत्तम जोशी हा ट्रॅक्टरने वखरणी करण्यासाठी आला असता त्यास जनार्धन जोशी यांनी विरोध केला.

यावरून बाचाबाची झाल्याने पुतण्याने थेट आपल्या काकावरच ट्रॅक्टर घातल्याने जनार्धन जोशींचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. घटनास्थळी अमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन पाटील, पीएसआय इंगळे, एएसआय टेकाळे सहकाऱ्यांसह दाखल झाले होते. पंचनाम्याअंती मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT