धुळ sakal
अकोला

अकोला : अकोल्याच्या धुळीवर आता ​यंत्राची मात्रा!

महापालिकेने खरेदी केल्यात चार रोड स्विपिंग मशीन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिकेच्या कृपने अकोला शहरातील कोणत्याही भागात गेले तरी धुळ ठरलेलीच. या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील किमान मुख्य रस्‍त्यांची तरी स्वच्छता नियमित व्हावी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने चार रोड स्विपींग मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला महानगरपालिकेला मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर मानसेवी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घ्यावी लागत आहे. सथ्य ७४० कायम आस्थापनेवर सफाई कर्मचारी नियुक्त आहेत तर ४०० पेक्षा अधिक कंत्राटी सफाई कामगार आहेत. सन २०१६ मध्ये महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने शहराची व्याप्ती वाढली.

स्वच्छतेच्या कामांचा ताणही वाढला. त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. परिणामी स्वच्छतेबाबतची ओरड सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने मोठ्या शहराच्या धर्तीवर शहरातील कॉक्रिट रस्त्याची झाडलोट करण्यासाठी शासनाने दिलेल्या विशेष निधीतून चार रोड स्विपिंग मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एका मशिनची किंमत दोन लाख १० हजार रुपये आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर महानगरपालिकेने चार रोड स्विपिंगची ऑर्डर दिलेली आहे. पुढील महिन्यात या मशिन शहरात दाखल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT