अकोला

परिचारिकांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

सकाळ वृत्तसेवा


अकोला ः विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने सोमवारपासून (ता. २१) आंदोलन करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारपासून परिचारिका सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत दोन दिवस कामबंद आंदोलन करत आहेत. त्यानंतर २३ व २६ जून रोजी दोन दिवस पूर्ण वेळ कामबंद तर २५ जून रोजी बेमुदत संप करण्यात येईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. (Nurses' agitation in Akola from today)

सर्व स्तरावरील १०० टक्के कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी. अतिरिक्त बेडसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी. परिसेविका, अधिसेविका, पाठ्यनिर्देशिकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता देण्यात यावा. कोविडच्या काळात ७ दिवस कर्तव्यकाळ व ३ दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी.

कोरोना काळात बंद केलेली साप्ताहिक सुटी देण्यात यावी. कोरोना काळात परिचारिकांच्या रजा स्थगित केल्यामुळे अर्जित रजा ३०० पेक्षा अधिक शिल्लक राहून रद्द होत आहेत, त्या कायम ठेवण्यात याव्या व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी. परिचारिकांचे पदनाम बदल्यात यावे. परिचारिकांना फक्त रुग्ण सेवेची कामे देण्यात यावी. मृत परिचारिकांच्या कुटुंबियांना विनाविलंब ५० लाख विमा व इतर सर्व देय आर्थिक लाभ लवकरात लवकर देण्यात यावे, परिचारिक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी सदर आंदोलन करण्यात येणार आहे.


रुग्ण सेवा होणार प्रभावित
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी सर्वोपचार रुग्णालयात बरेच रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच परिचारिकांनी आंदोलनाची हाक दिल्यामुळे आंदोलन काळात सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nurses' agitation in Akola from today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT