अकोला

अकोला : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्‍यावसायिकांवर कारवाई

चायनीज मांजाच्‍या वापरावर प्रतिबंध करण्‍यासाठी विशेष पथक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मनपा (Akola Municipal Corporation) आयुक्‍त कविता व्दिवेदी यांच्‍या व्‍दारे शहरात होत असलेल्‍या चायनीज मांजाच्‍या (Chinese Manja) वापरावर प्रतिबंध करण्‍यासाठी विशेष पथकाची समती गठीत केली होती. या समितीने ता. ७ जानेवारी रोजीकारवाई केली.

महानगरपालिका क्षेत्रातील जठारपेठ परिसर, उमरी परिसर, सातव चौक परिसर आणि मराठा नगर परिसरातील विविध दुकानांवर तपसणी दरम्‍यान नायलॉन मांजा (Nylon Manja) आणि शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लॅस्‍टीकच्‍या पतंग विक्री करताना आढळून आल्‍याने त्‍यांच्‍या कडे असलेला साठा जप्‍त करून त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

ज्‍यामध्‍ये बाबुभाई पतंगवाले, राजकुमार जनरल स्‍टोर्स, गणेश जनरल स्‍टोर्स, शांतनू कॉम्‍युनिकेशन, दिलीप यादव, सुनील निलखन, शुभम बनकर या व्‍यावसायिकांवर एकूण १३ हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

ही कारवाई जिल्‍हाधिकारी यांच्‍या निर्देशाप्रमाणे, मनपा आयुक्‍त कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशन्‍वये व मनपा उपायुक्‍त डॉ.पंकज जावळे, पुनम कळंबे यांच्‍या मार्गदर्शनात झाली करण्यात आली. या कारवाईत मनपा आरोग्‍य अधिकारी प्रशांत राजुरकर, बाजार विभागाचे रविंद्र निवाने, राजकुमार जुनगडे, सुरेंद्र जाधव, संतोष मोहोकार, सुधाकर सदांशिव, अतिक्रमण विभागाचे ईकबाल हुसेन, एन.जी.ओ. राखी वर्मा, गौरव मौर्य, गुंजन हिंगे, आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT