Oh wow Eight members of this family are Corona Warriors, each of whom contributes invaluably ... 
अकोला

अरे व्वा ! एकाच कुटुंबात चक्क आठ कोरोना योध्दे, प्रत्येकाचे योगदान अमुल्यच...

सकाळ वृत्तसेेवा

शेगाव (जि.बुलडाणा  )ः    सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा हाहाकार असून राज्यात मुंबई आणि पुणे ही शहरं आघाडीवर तर आहेतच. याशिवाय विदर्भात अकोला, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. असे असले तरी ग्रामीण भागात कोरोना विषाणूनचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचारी, पोलिस विभागासह सामाजिक कार्यकर्तेही अहोरात्र काम करताहेत.

एकाच परिवारातील आठ जण ठरले कोरोना योद्धे
यातच शेगाव येथील एकाच कुटुंबातील आठ सदस्य करोनाच्या लढाईत आरोग्य सेवेचे व्रत हाती घेऊन करोना रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना विषाणूने प्रादूर्भावाने अख्खं जग सद्या हादरलेलं आहे. संपूर्ण जगात करोनाचा कहर सुरू असताना प्रशासन, डॉक्टर, पोलीस यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे जीवाची बाजी लावून कशाचीही पर्वा न करता अहोरात्र देशसेवा करत आहेत.

सुनीता महाजन- सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे कक्षसेवीका
शेगाव शहरातील महाजन कुटुंबातील एक नव्हेतर आठ सदस्य कोरोना लढाईत सामील आहेत. शेगाव शहरातील सुनीता महाजन या येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे कक्षसेवीका म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी त्या करोनाबाधित व्यक्तींची काळजी घेत आहेत.

लक्ष्मी महाजन - चव्हाण मेडिकल कॉलेज येथे स्टाफ नर्स
या सुनीता महाजन यांच्या स्नुषा लक्ष्मी गणेश महाजन या यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेज येथे स्टाफ नर्स म्हणून कर्तव्यावर आहेत. कोरोनाच्या लढ्यात कोविड इमर्जन्सी सेवेत त्या कार्यरत असल्याने त्यांचा १४ वर्षाचा मुलगा प्रथमेश व पाच वर्षांचा मुलगा आयुष याला आजी व काकूकडे सांभाळायला ठेवले असून, त्या करोना लढाईत महत्वाची भुमिका पार पाडत आहेत.

आधी कोरोनाची लढाई मग परिवार
लक्ष्मी महाजन यांचा पाच वर्षांचा मुलगा आयुष याला आजीकडे ठेवून त्या कर्तव्य बजावत आहेत. मुलाच्या वाढदिवसालाही त्यांना जाता आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. मात्र, रुग्ण सेवेतून देशसेवा महत्त्वाची असल्याचे लक्ष्मी महाजन यांनी सांगितले.

मंगेश महाजन - अकोला सिटी कोतवाली पोलिस दलात
लॉकडाऊन मध्ये आपल्या कामातून देशसेवेला महत्त्व देणाऱ्या मंगेश महादेव महाजन हे अकोला सिटी कोतवाली पोस्टेला शिपाई म्हणून कार्यरत आहेत. कोरोना युद्धात महत्वाचे योगदान आहे.

प्रिया महाजन-अमरावती येथील इर्विन हॉस्पिटलमध्ये अधिपरीचारिका
प्रिया विजय महाजन या सेवानिवृत्त महसुल अधिकारी यांच्या पत्नी असून त्या अमरावती येथील इर्विन हॉस्पिटलमध्ये अधिपरीचारिका म्हणून कार्यरत असून कोरिनाच्या लढ्यात त्या कोविड इमर्जन्सी सेवेत कार्यरत आहेत.

पल्लवी महाजन - कामगार हॉस्पिटल मध्ये अधिपरीचारिका
पल्लवी महाजन - वराडे या औरंगाबाद येथील कामगार हॉस्पिटल मध्ये अधिपरीचारिका म्हणून काम पाहतात. सध्या त्या कोरोनाच्या लढ्यात परिचारिका संवर्गाची व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

पूजा वैराडे - अकोला मेडिकल कॉलेज येथे अधिपरीचारिका
याच कुटुंबातील कु. पूजा एकनाथ वैराडे ही अकोला मेडिकल कॉलेज येथे अधिपरीचारिका म्हणून कर्तव्यावर असून कुठलीच परवा न करता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून या प्रतिकुल परिस्थितीत कोरोना युद्धात सहभागी झाली आहे. 

 विनोद गिते- अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौकीदार
 विनोद दिगंबर गिते हे माजी सैनिक पुत्र असून हे अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौकीदार म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या ड्युटीलाच आपला धर्म मानून अहोरात्र रुग्णसेवेत तत्पर सेवा देत आहेत.  

प्रतीक गिते - अकोला येथील खासगी रुग्णालयात सेवा
विनोद गिते यांचा मुलगा प्रतीक गिते हा सुध्दा अकोला येथील खासगी रुग्णालयात सेवा देत आहे. या लढाईत हे कर्तव्यदक्ष आपली लहान मुले दूर ठेवून करोनाशी लढत आहेत. करोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणारे सगळेच प्राण पणाला लावून काम करीत आहेत. किंबहुना त्यापेक्षा जास्त आरोग्य सेवेचे कार्य करत असून, करोना लढाईत पुर्णपणे सज्ज होउन त्या लढाईत उतरले आहेत.

जीव धोक्यात टाकून रुग्णसेवेला प्राधान्य
रुग्णसेवा बजावत असताना डॉक्टर व नर्स यांना प्रोटेक्टिव किट अंगावर चढवणे व उतरवने याला एक प्रध्दत आहे. या प्रक्रियेला साधारण २० मिनिटे लागतात. त्यामुळे एकदा ही किट घातली की, किमान ६ ते ७ तास काढता येत नाही. या उन्हाळ्या दिवसात त्यांना पाणीही पिता येत नसल्याने अशा प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी स्वताचा जीव धोक्यात टाकत आहेत. अशा कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या योद्धांना मानाचा मुजरा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT