bus accident, buldana e sakal
अकोला

बस व ट्रकचा भीषण अपघात; एक जागीच ठार, २५ जखमी

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : जालना रस्त्यावर हॉटेल वीरासमोर ट्रकने बसला जोरदार धडक (truck bus accident buldana) दिली. या भीषण अपघातामध्ये बसमधील एक वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर २५ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता अपघाताचा महामार्ग ठरत आहे. या वळण रस्त्यावरील कुंभारीवर ट्रक दुचाकी अपघातात अंढेरा येथील दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच वळण रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला आज परत अपघात झाला. जालनाच्या दिशेने देऊळगाव राजाकडे येणाऱ्या बसला चिखली येथून जालनाकडे जाणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. सदर अपघातात गयाबाई खंडारे (वय ८० रा. मेहकर) जागीच ठार झाली, तर पंचवीस प्रवासी जखमी झाले. कोणी राखीसाठी माहेरी जात होते, तर कोणी घरी परतत होते.

जखमीमध्ये मौफिज बेग (वय ४२ लाखनवाडा), रजिया मुन्ना (वय ३१ कारंजा), आर एफबी शेख (वय ४० नारेगाव), रेना चंदनशिवे (वय ४० राहणार देऊळगाव राजा), मारुती हरकळ (वय ५० जालना), वसंत देवकर (वय ४० राहणार वाशिम), मोसिन बेग (वय ५० औरंगाबाद), यशदीप चंदनशिवे (वय १६ देऊळगाव राजा), मुसा बाबू मुलीवाले (वय 35 वाशिम), आनंद वाडनकर वय ४२ देऊळगाव खुटा, बाबासाहेब देशमुख वय ५८ घाटंजी, संगीता हरकळ वय ४० परतूर, कोमल सोनवणे वय ३० दे राजा, दिगंबर दातआवळे वय ४५ गारखेड, सुशीला पवार वय ६५ लोणार, विकास आरसर वय ४५ रिसोड, श्याम गोफणे वय ३६ औरंगाबाद, प्रकाश जोशी ५८ राहणार औरंगाबाद, मकरंद पीपळगावकर, अनिल खंदारे वय २९ मेहकर, शेख रफिक वय ६५ नारेगाव, आरमान मुन्नीवाले ३७ कारंजा, आदित्य दौळकर औरंगाबाद, श्रीकांत जाधव वय २० दे.राजा, परी उमेश दौळकर वय ४२ औरंगाबाद यांचा जखमीमध्ये समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे, यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बालाजी संस्थान अ‌ॅम्बुलन्स व शासकीय अ‌ॅम्ब्युलन्सद्वारे जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. सदर अपघातात मृत वृद्ध महिला मेहकर येथील असून या भीषण अपघातात २३ प्रवासी किरकोळ, तर दोघे गंभीर जखमी झाले. बस चालक मोहसीन करीम शेख वय ३८ राहणार मांडूळ गेवराई जिल्हा बीड यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT